शिवसेनेत खांदेपालटाचे स्पष्ट संकेत : अजय स्वामी गट सक्रिय : प्रभारी जिल्हाप्रमुखांविरुद्ध अहिरांची पक्षप्रमुखांकडे तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेनेत खांदेपालटाचे स्पष्ट संकेत : अजय स्वामी गट सक्रिय : प्रभारी जिल्हाप्रमुखांविरुद्ध अहिरांची पक्षप्रमुखांकडे तक्रार

Share This
खबरकट्टा संपादकीय /चंद्रपूर : (गोमती पाचभाई : मुख्य संपादक )

(चंद्रपूर-बल्लारपूर-राजुरा क्षेत्र विशेष )

शिवसेना आमदार धानोरकर यांची काँग्रेस खासदारकीकडे वाटचाल सुरु होताच चंद्रपूर जिल्हा शिवसेनेची प्रभारी सूत्रे लोकसभा निवडणूकपूर्व सहा महिन्याआधी पक्ष नेतृत्वाकडे जिल्हाप्रमुख बदलविण्याची वारंवार मागणी करणाऱ्या संदीपभाऊ गिऱ्हे व नितीनभाऊ मत्त्ते यांच्याकडे देण्यात आली.

प्रभारी पूर्ण-भारी होण्याच्या वाटेवर असताना जिल्हयातील पक्षाअंतर्गत वातवरण मृग नक्षत्र लागताच सर्वत्र ढगाळ झाले असून कोणत्याही क्षणी पाऊस पडून साफसफाई होण्याचे स्पष्ट संकेतीक वारे  मुंबईहून चंद्रपूर च्या दिशेने वाहत  आहेत. सोबतच पक्षाअंतर्गत टीम बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही नेते व सक्रिय कार्यकर्त्यांनी  आज दिनांक 22 जून 2019ला माजी संपर्क व जिल्हा प्रमुख अजय स्वामी यांच्या स्वगृही बैठक घेऊन पुन्हा पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी मनधारणी करून अजय स्वामी यांचा होकार मिळविला असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती येत आहे.

लोकसभा निवडणुकीत युती उमेदवाराच्या प्रचार-प्रसाराला सक्रियतेने बाहेर पडण्यापेक्षा तारांकित हॉटेलात वातानुकूलित आनंद घेणे व तळागाळातील प्रचाराला पाठ फिरवून सर्व जुन्या नवीन शिवसैनिकांची मूठ बांधून प्रचार करण्यास हे प्रभारी सपेशल नापास झाल्याच्या अनेक तक्रारी मुंबईत धडकल्याने सोबतच युतीचे एकमेव पराभूत उमेदवार माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी मागील 500000च्या वर मतदानाचा आकडा कायम असूनही फक्त 45000मतदान कमी पडल्याच्या मुद्द्याला गांभीर्याने  घेत या प्रभारींवर निवडणूक खर्च व धानोरकर समर्थित कार्यकर्त्यांना ढिलाईने घेऊन काँग्रेस उमेदवाराला मदत केल्याचा ठपका ठेवणारी तक्रार थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेकडे केली असल्याने चंद्रपुरातील तापमान मुंबईत पोहोचुन गर्मी वाढण्यास कारणीभूत ठरले.

प्रभारी जिल्हाप्रमुखाविरुद्ध निवडीपासूनच पक्षाअंतर्गत टीम बी (माजी संपर्क प्रमुख- श्री रमेश देशमुख, माजी नगरसेवक आकाश साखरकार, धनंजय छाजेड समर्थक ) व टीम सी (माजी जिल्हा प्रमुख-सतीश भिवगडे,नगरसेवक सुरेश पचारे,महानगर प्रमुख-मनोज पाल, जयदीप रोडे, नितीन पिपरे ) सतत मुंबई-चंद्रपूर-मुंबई वारी करीत असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. परंतु या दोन्ही गटांना अपेक्षित यश लाभत नव्हते. चंद्रपूर-बल्लारपूर-राजुरा या विधानसभा प्रभागातील काही नेते व कार्यकर्ते (माजी नगरसेवक व सक्रिय कार्यकर्ते बंडू हजारे,प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन भोयर, राजुरा तालुका प्रमुख व्हिग्नोज राजूरकर,पोंभुर्णा युवा कार्यकर्ते आशिष कवटवार, माजी युवासेना उपतालुका प्रमुख विक्रांत सहारे, सुरज घोंगे सहित अनेक सक्रिय युवा कार्यकर्त्यांचा गट प्रभारी जिल्हा प्रमुखाच्या समर्थानात असूनही संभ्रमात असल्याचे चित्र तयार झाले आहे.

लोकसभेची आचारसंहिता संपण्याच्या पूर्वसंध्येलाच प्रभाऱ्यांना विश्वासात न घेता माजी नगरसेवक आकाश साखरकर यांना चंद्रपूर महानगर प्रमुख, विक्रम उर्फ हर्षल शिंदे यांना युवासेना जिल्हाप्रमुख व पक्षात नवख्याच आलेल्या वर्षा कोठेकर यांची महिला जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच कोठेकर यांनी सोसिअल मीडिया वर वायरल केल्याने या सर्व पक्षाअंतर्गत गटातील वादांना आणखी चालना मिळून सामना मध्ये अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच पदरद्दबाबत घोषणा होण्यावर झाली.

त्यानंतर काहीसे वातवरण नरमाईकडे लागताच कोणत्या न कोणत्या पदावरून सतत होणारी सक्रिय शिवसैनिकांची नाराजगी सुद्धा प्रभाऱ्यांनी अल्पावधीतच ओढवून घेतली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख ते प्रभारी जिल्हाप्रमुख असा कमी वेळात एका प्रभारी जिल्हाप्रमुखाने पल्ला गाठल्याने, युवासेना जिल्हाप्रमुख पदाचेही वलयं अचानक  वाढले असून विक्रम शिंदे यांच्या आरूढ होण्याआधीच काढलेल्या या पदाकरिताही अनेक दावेदार पुढे येत असून गडचांदूर येथील नगरसेवक व विद्यमान युवासेना जिल्हाप्रमुख सचिनभाऊ भोयर यांना राजुरा विधानसभेचे डोहाळे लागल्याने ते आपल्या जागी कोनाला बसवू इच्छितात हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे.

पोंभुर्णा तालुल्यातील आशिष कवटवार, चंद्रपूर येथील विक्रांत सहारे व निलेश बेलखेडे या तीन कार्यकर्त्यांमध्ये युवासेना जिल्हाप्रमुखसाठी टोकाचा संघर्ष सुरु असल्याची माहिती पूर्ण वेळ कार्यालय प्रभारी असणाऱ्या कार्यकर्त्याने दिली.

अधिक माहिती नुसार स्वतः ला मॅनॅजमेण्ट गुरु समजणारे आशिष कवटवार सध्या ग्रामपंचायतीच्या पोट  निवडणुकीत आवश्यक मदत न मिळाल्याच्या कारणावरून प्रचंड नाराज असून त्यांनी स्वतः ही नाराजगी अनेक शिवसैनिकांना बोलून दाखविल्याने त्यांच्या  पक्ष निष्टे वर  व नेता प्रेमावर आश्चर्य केल्या व्यक्त केल्या  जात आहे.दुसरे स्पर्धक निलेश बेलखेडे हे एका खाजगी पॉलिटेक्निक येथे कार्यरत असून मागील वर्षी त्यांना पक्षात प्रवेश घ्यायला लावून जाणूनबुजून पदासाठी टांगत ठेवल्यामुळे त्यांची सक्रियता स्वस्थापित संस्थेकडे जास्त आहे, त्यांची युवकांची फळी साधारण आहे  व शिवसेनेत असूनही ते वारंवार सांगूनही दरवर्षी शिवजयंती पक्षाविरुद्ध जाऊन तिथीनुसार न करता तारखेप्रमाणे शहरात साजरी करतात हा पक्षविरोधी गंभीर विषय समजल्या जातो आहे तर विक्रांत सहारे हे अनेक वर्षांपासून युवासेना सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्या मागे चंद्रपूर शहरातील युवकांचे खूप मोठे जाळे असूनही त्यांना सतत लॉलीपॉप मिळत असल्याने "हम भले - हमारा मित्र परिवार भला" असा शांत पवित्रा घेत त्यांनी उघडपणे नाराजगी व्यक्त केल्याने जिल्हा कार्यालयात युवकांची रेलचेल-उठबस कमी झाल्याचे बोलल्या जात आहे.

या सर्व ढगाळ वातवरणात दोन दिवसांपूर्वी सेनाभवन येथून विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर साहेब यांचा अजय स्वामी यांना आलेल्या फोन कॉल ची चंद्रपुरात खमंग चर्चा असून काही शिवसैनिकांत खांदेपालटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून काही संभ्रमित अवस्थेत असल्याचे नाव न लिहिण्याच्या अटीवर वरिष्ठ शिवसैनिकाने सांगितले.

या सर्व घडामोडीत शिवसेनेच्या 53 व्या  वर्धापन दिनानिमित्य मुंबईत गेलेल्या शिवसैनिकांसमोर राजुरा येथील महिन्याभरापूर्वी उपजिल्हा प्रमुख पद पदरात पाडून घेणाऱ्या माजी तालुका प्रमुखाची पक्षास मंचावरून शिवीगाळ केल्याच्या गंभीर कारणावरून हकालपट्टी केली असून या पुढे हा व्यक्ती पक्षात नको अशी तंबी पूर्व विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर साहेब यांनी दिली असल्याची शिवसैनिकांची ऑडिओ क्लिप सोशिअल मीडिया वर फिरत होती.

चंद्रपूर-बल्लारपूर-राजुरा विधानसभा क्षेत्र  जिल्हाप्रमुखांसाठी अजय स्वामी व वरोरा-चिमूर-ब्रम्हपुरी क्षेत्र दत्ता बोरीकर यांचे नावावर लवकरच शिक्केमोर्तब  होणार असल्याची खात्री लायक माहिती असून पुढचे काही दिवस जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या नजरा या वृत्ताकडे खिळल्या असतील. या नंतरही पक्षाअंतर्गत वाद कमी होण्यास कितपद मदत होते हे महत्वाचे राहील.

(वरोरा-चिमूर-भद्रवती क्षेत्र विशेष पुढील भागात )