धिडसी- गावातील विद्युत खंडणीच्या विरोधात बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला घेराव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धिडसी- गावातील विद्युत खंडणीच्या विरोधात बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला घेराव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा तालुक्यातील धिडसी येथे मागील 10-15 दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. उष्णतेच्या लाटेत गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर  त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. 


त्यांची समस्या जाणून घेत बबनभाऊ उरकुडे यांनी थेट महावितरण कार्यालय गाठले आणि अखंड विद्युत पुरवठा झाला पाहिजे अशी प्रखर भूमिका मांडली, कढोली येथील लाईनमन पडवेकर यांना वेळोवेळी सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही अश्या कर्मचाऱ्याला बदलण्याची  मागणी करण्यात आली या प्रसंगी गावचे सरपंच कोरडे पाटील, ढके पाटील, महेंद्र पाहानपट्टे, डा. काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

समस्याचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे अन्यथा शिवसेना राजुऱ्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.