चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी : बल्लापूर बस स्थानकाचे पुन्हा कोसळले छत : राजुरा येथे गारांचा वर्षाव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी : बल्लापूर बस स्थानकाचे पुन्हा कोसळले छत : राजुरा येथे गारांचा वर्षाव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यात आज विविध ठिकाणी सकाळपासूनच असलेल्या ढगाळ वातावरनावर व 47.8°c तापमानावर मात करत सायंकाळी वादळासहितहंगामातील पहिल्या पावसाने हजेरी लावली.


राजुरा तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या चकमकीसहित पावसाने हजेरी लावत  झाडांची पडझड सोबतच  गारांचा वर्षाव झाला.

तर बल्लारपूर येथेही वादळी पावसाच्या तळख्यात नवीन बस स्थानकाच्या छताचे पीओपी पुन्हा कोसळले असून पावसाचा जोर जास्त असल्याने छताच्या साचलेल्या पाण्याच्या धारा बस स्थानकाच्या आतील भागात पडू लागल्याने तालावसदृश स्थिती निर्माण होऊन प्रवाश्याना गैरसोय झाली.

पहिल्याच पावसाने गारा वादळासहित जरी हजेरी लावली असली तरी उच्चांक तापमानात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.