चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप नलगे यांचे निधन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप नलगे यांचे निधन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा शहर प्रतिनिधी :

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा चे संचालक, कॉंग्रेस चे जेष्ठ नेते माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर ह्यांचे भाचे दिलीप नलगे ह्यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.


सरपंच पदापासून राजकीय जीवनाचा प्रारंभ करणारे दिलीप नलगे ह्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी राजुरा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

दिलीप नलगे ह्याचे पश्चात जिल्हा परिषद सदस्य असलेल्या पत्नी तसेच मुलगा, सून, मुलगी, नातवंडे तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

टीम खबरकट्टा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌷💐