नोकारी येथिल आदीवासी जमीन खरेदी नोंदी रद्द करण्याची आबिद अली यांची मागणी :माणिकगड सिमेंट कंपनी निवासी गाळे जमीन प्रकरण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नोकारी येथिल आदीवासी जमीन खरेदी नोंदी रद्द करण्याची आबिद अली यांची मागणी :माणिकगड सिमेंट कंपनी निवासी गाळे जमीन प्रकरण

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -                                                       
गडचांदुर स्थीत माणीकगड सिमेंट कंपनी ने कुसंबी चुनखड्डी माईन्स जमीन भुपुष्ठ अधिकारी व आदीवासी जमीन प्रकरनाचा वाद प्रशासन व न्यायप्रविष्ठ चक्रात अडकले असतानाच लगतच्या  नौकारी येथील थेट आदिवासी मालकीच्या जमिनी  खरेदी करुण आदीवासीच्या जमीन व्यवहारामुळे नविन वादाला तोंड फुटले आहे.


महसुल प्रशासन आदीवासी कायदा बाजुला सारत  चुकीचा अहवाल तयार करूण आदिवासी सरंक्षण व हित जोपासण्या ऐवजी त्याचा बळीघेत मौजा नोकारी येथिल भुमीस्वामी कृषक जमीनी 1995 मध्ये मुळ मालकीच्या शेत जमीन महसुल अहवालात नोंदी मध्ये हेराफेरी करून,  त्या जमीनी सिलींग वाटप दाखवुन  सिलींग नुसार या गावात लाभार्था नसताना सर्व्हे नं  18/1,18/2, 20/2,21,22/1,2 3,25,26,27,28 ह्या सर्व्हे नबंर जमीनीच्या 7/12व नमूना 8 तसेच 1ते 35सव्हें नंबर जमीनी 1964 च्या भुमापन मोजणी मध्ये सिमांकन हद्दनोंदी आहेत.

सण 1953 पासून उपरोक्त जमीनीच्या महसुल अभिलेखात आदिवासी च्वा मालकी हक्काच्या नोंदी आहेत ह्या जमीनी आदिवासी जमीन धारण नियम 1961च्या 29 अंर्तगत 36 (अ व ब )नुसार हस्ता तरं बंदी असताना दि सेंचुरी टेक्स इंड मानीकगड  सिमेंट कंपनी गडचांदुर यांनी 1995 मध्ये खरेदी खत कार्यालयात नोंद करुण त्या जमीनी वर इमारती व वाणीज्य वापर करीत आहे.

तलाठी व मंडल अधिकारी यांनी फेरफार क्र 97 दि.09/081995 ला नोंदी घेतल्या ने आदीवासी हक्क व संरक्षण हयाबाबी कडे दुर्लक्ष झाल्याने सिलीगं वाटप जमीनी नसताना चूकी च्या अहवाल तयार करुण शासनाची दिशाभुल करुण जमीन खरेदी विक्री व्यवहार सोपस्कर पद्धतीने  आदिवासी कायदयाला बगल देत नियम बाहय व्यवहार करण्यात आल्या ने जमीनी वर कर्मचारी निवास स्थान व यात्रीकं वाहन गॅरेजसाठी वापर करीत जमीन अकृषक वाणिज्य वापर होत असताना महसुल विभाग परावर्तीत व् भूधारण नोंदी  व दुरूस्ती कमी जास्त पत्रक कर आकारणी नोंददुरुस्ती न करता शासनाचा महसुल बुडविला.

या जमीन खरेदि  व्यवहारातुन आदीवासी कुटूबांवर अन्याय करणारा बाधीत आदिवासी कोलाम जमीनी वर उद्योग उभा झाला तदनंतरही त्यांना नौकरी दिली नाही व रोजगारा चा हक्क हिसकल्याने या आदिवासी बांधवाना उघड्यावर वन उपजावर पोटाची खडगी भागविण्याची पाळी आली आहे.

फेरफार व खरेदी व्यवहार संशयास्पद नियम बाहय असल्या ने 2वरेदी नोंदी रद्द  करूण 7/12 रेकार्ड दुरूस्त करण्यात यावे व आदीवासी फसवणुक संबधात चौकशी पथक द्वारे उत्खनन व जमीन प्रकरणा ची चौकशी व दोषी वर कार्यवाही करण्यात यावी  या साठी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जनसत्याग्रह संघटने चे आबीद अली भाऊराव कन्नाके, मारोती येडमे , परशुराम आत्राम, बापूराव आत्राम, केशव कुडमेथे यानी केली असुन आदीवासी आंदोलनाचा इशारा दिला आहे.