अवैध दारु तस्कराला मुद्देमालासह अटक : गडचांदूर पोलिसांची कारवाई - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध दारु तस्कराला मुद्देमालासह अटक : गडचांदूर पोलिसांची कारवाई

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

गडचांदूर परिक्षेत्रातील अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने हल्ली पोलिस कमालीची कामगिरी बजावताना दिसत असून सट्टापट्टी व अवैध दारू अशा अवैध धंद्यांवर धाडी टाकत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच श्रेणीत अंबुजा फाटा, नांदाफाटा,आवारपूर व गडचांदूरातील विविध धाब्यांवर खुलेआम होत असलेल्या दारुविक्रीवर सुद्धा पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    
राजूरा मुख्य मार्गावरून दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच शुक्रवार, शनिवारच्या मध्यरात्री थुटरा फाटा जवळ सापडा रचण्यात आला.रात्री अंदाजे 1 वाजताच्या दरम्यान विरुद्ध दिशेने मोटारसायकल वरून येत असलेल्या सैय्यद मुख्तार अली नामक व्यक्तीचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.झडती घेतली असता याच्या जवळ 45 नग विदेशी दारुच्या बाटलं सापडल्या. 

याच्याकडून पोलिसांनी एक मोटारसायकल क्रमांक एम. एच.34 बीजी 0879 किमत 40 हजार,दारू किमत 9 हजार,एक मोबाईल 10 हजार असा एकूण 59 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून दारुबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई केरबा कवडे यांनी चोखपणे पारपाडलीे.