डॉ गिरीधर काळे यांचा वाढदिवस 91युवकांनी रक्तदान करून केला साजरा : ग्रामसभेने दिली 'डॉक्टरेट' : आता शासनाने दखल घ्यावी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डॉ गिरीधर काळे यांचा वाढदिवस 91युवकांनी रक्तदान करून केला साजरा : ग्रामसभेने दिली 'डॉक्टरेट' : आता शासनाने दखल घ्यावी

Share This
डाॅ.गिरीधर काळेची लोकसेवा समाजाला प्रेरणादायी :रुग्णालयात फळवाटप व नवजात बालकांना वस्त्रदान
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमीत्य  गडचांदूर येथे डॉ जयदीप यादवराव चटप यांच्या क्लिनिकला भव्य रक्तदान शिबीर पार पडले. परिसरातील ९१ युवकांनी  रक्तदान करुन समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या लोकसेवेला सलाम केला. डॉ.काळे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, गडचांदूरच्या नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, पं.स सदस्य सविता काळे, यादवराव चटप, सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर, डाॅ.सचिन मेश्राम, रक्तदूत मंगेश पाचभाई, अभिनय किनेकर, डॉ.धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. पवार उपस्थित होते.

समाजसेवक डाॅ.गिरीधर काळे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या हाडांवर निशुल्क उपचार करीत आहे. वयाच्या १६ व्या वर्षापासून आजतागायत ३३ वर्षे त्यांची प्रदीर्घ सेवा कोरपना तालुक्यातील बिबी येथे सुरू आहे. चार लाखांपेक्षा अधिक अस्थिरुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. पुण्या-मुंबईसह परराज्यातूनही रोज शेकडो अस्थिरुग्ण त्यांच्याकडे येतात. विदेशातील 'इटली' येथील महिलेने देखील मागील वर्षी त्यांच्याकडे उपचार घेतले. व्यवसायाने शेतकरी असलेले गिरीधर काळे रोज साधारणता आठ ते दहा तास अस्थिरुग्णांची निशुल्क सेवा करत आहेत. 

कार्यक्रमात व्यसनमुक्ती कार्याबद्दल लक्ष्मीकांत धानोरकर, नाट्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल मयूर एकरे, पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक खेकारे, पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, कर सहाय्यक निलेश मालेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मनोज भोजेकर व सतीश बिटकर यांच्या पुढाकाराने गडचांदूर मित्रमंडळातर्फे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व नवजात बालकांना वस्त्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.दीपक चटप यांनी केले. संचालन महालिंग कंठाळे तर आभार सुकेश ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश पोईनकर, पुरुषोत्तम निब्रड, डॉ.शैलेश विरुटकर, रत्नाकर चटप, रोशन आस्वले, हबीब शेख, वैभव राव, सुयोग कोंगरे, लक्ष्‍मण कूडमेथे, महेश देरकर, विकी उरकुडे, अजय रोगे, किशोर विधाते, जयंत जेनेकर, सतीश जमदाडे, सतीश पाचभाई, श्रीकांत मोहारे व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.ग्रामसभेने दिली 'डॉक्टरेट' : आता शासनाने दखल घ्यावी

समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यांच्या निस्वार्थ लोकसेवेने बिबी गावाची ओळख सर्वदूर आहे. तीन दशक निस्वार्थ सेवा करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांची अजूनही लोकप्रतिनिधी, शासनाने दखल घेतली नाही. त्यांचे कार्य लक्षात घेता काही मित्रमंडळींनी लोकजागर करीत २६ जानेवारी २०१५ रोजी प्रजासत्ताक दिनाला बिबी ग्रामसभेत त्यांना 'डॉक्टर' ही उपाधी देण्याचा ठराव मांडला आणि तो संमत झाला. देशातील हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय ठरला. ग्रामसभेचे ते देशातील पहिलेच 'डॉक्टरेट' ठरले. लोकप्रतिनिधी व शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करावा अशी मागणी होत आहे.