खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही प्रतिनिधी :
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील 9 महिन्याच्या बाळाला वाघाने घरातून उचलून ठार केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली.
राकेश सचिन गुरूनुले असे या बाळाचे नांव असून तो घरी झोपेत असतांना रात्रौ तीन वाजताचे दरम्यान वाघानी घरात शिरून अलगद उचलले व बाहेर धूम ठोकली.
बाळाचा आवाज आणि झालेली हलचल पाहून घरचे लोक जागे झाले मात्र तोपर्यंत वाघानी बाळाला घेवून पोबारा केला होता.
पायाचे खुणावरून वाघ असल्यांचे लक्षात आल्याने गावकऱ्यांनी ही बाब वनविभाग व पोलीसांना कळविली. दोनही विभाागाचे कर्मचारी, गावकरी यांनी शोध घेतला असता, वाकल रोडवर तलावाजवळ हुळकीवरील बांबूच्या रांंजीत छिन्नविछिन्न अवस्थेत मृत अवस्थेत राकेश आढळला. वाघानी राकेशचा एक पायच तोडून नेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगीतले.