दहावीच्या निकालाची तारीख ठरली : 8जून ला दुपारी 1वाजता होणार जाहीर : कसा बघाल निकाल वाचा संपूर्ण बातमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दहावीच्या निकालाची तारीख ठरली : 8जून ला दुपारी 1वाजता होणार जाहीर : कसा बघाल निकाल वाचा संपूर्ण बातमी

Share This
खबरकट्टा / महराष्ट्र :

SSC Result mahresult.nic.in 

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, आता दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांना आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावीचा निकाल उद्या शनिवारी 8 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालासंबंधीत विविध तारखा फिरत होत्या.  मात्र तो मेसेज चुकीचा असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं होत. त्यानंतर आज अखेर बोर्डाने  उद्या 8 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं.

निकाल कुठे पाहाल ?
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com

दहावीचा निकाल कसा पाहाल?
दहावीचा निकाल पाहताना तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा. जेव्हा तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर जाल, तेव्हा तिथे परीक्षा क्रमांक टाईप करावा लागले. कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. नंतर आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा.

उदाहरणार्थ :समजा तुमचा परीक्षा क्रमांक M123456 असेल आणि आईचे नाव सोनल असेल, तर तुम्ही रिझल्ट वेबसाईटवर पहिल्या कॉलममध्ये M123456 आणि दुसऱ्या कॉलममध्ये म्हणझे आईच्या नावाच्या कॉलममध्ये SON असे टाईप करा. त्यानंतर एन्टर केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल.

दरम्यान, दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर मग काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी निकालाचे प्रमाणपत्र घेऊ शकतात. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीचे बोर्ड दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख, वेळ कधी जाहीर करतं, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.