नांदाफाटा येथील रमेश शनिगरापू या युवकाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण : खुल्या विद्युत तारा 3दिवसा पासून रोड वर दुर्लक्षित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नांदाफाटा येथील रमेश शनिगरापू या युवकाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण : खुल्या विद्युत तारा 3दिवसा पासून रोड वर दुर्लक्षित

Share This
-लाईनमनच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव टांगणीला 
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -

दिनांक 3जून 2019 रोजी सांयकाळी 6 वाजताचे वादळाने पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ अनेक विद्युत पोल कोसळल्याने याठिकाणी रोडवर क्रॉस मध्ये विजेच्या तारा खुल्या पडल्या होत्या या विद्युततारा तीन दिवसांपासून रोडवर पडून असताना सुद्धा नांदाफाटा येथील लाईनमनद्वारे विद्युततारा कापून बाजूला करण्यात आल्या नाहीत.


विद्युततारा रोडवर पडून असल्याची पाहणी केल्यास सामान्य व्यक्तीला सुद्धा वाटेल की या विद्युततारा तात्काळ कापून रोडच्या बाजुला केल्या नाहीत तर यात अडकून जीवित हानी होऊ शकते परंतु ही बाब त्या ठिकाणचे लाइनमनच्या लक्षात आली नाही हे नवलच आहेत लाईनमनद्वारे या कामाकडे इतके दुर्लक्ष का करण्यात आले असे काय काम त्याचे मागे होते की विद्युततारा तीन दिवस रोडवर पडून राहल्या या विद्युततारा मुळे 5 ते सहा लोकं पडल्याची माहिती आहे याची चौकशी होऊन यात दोषी लाईनमनवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

काल दिनांक 5 जून रात्रीचे १० वाजता चे सुमारास नांदाफाटा येथील तेलगु वस्तीत  वास्तव्य करणारा रमेश शनिगरापू हा युवक कामानिमित्त पिंपळगावला मोटारसायकल ने जात असतांना श्रीकृष्ण नगरी जवळील पडून असलेल्या विद्युततारात तो मोटारसायकल घेऊन पडला. मोटरसायकलसह तो तारात अडकल्याने त्याच्या मानेवर व पायावर जबर मार लागला त्याचे नशीब बलवत्तर असल्यानेच तो अपघातातून सुदैवाने बचावला.

सध्या या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने त्याचे मोटारसायकल वेगात नव्हती अपघात झाल्यानंतर तो कसा बसा नागरिकांच्या मदतीने दवाखान्यात पोहोचला त्याठिकाणी त्याचेवर उपचार करण्यात आला अपघाता बाबतची माहीती त्याचा मित्र जानी गोस्की व इतरांना माहीत झाल्यावर ते  सर्वजण रमेशला घेऊन त्याची मोटरसायकल आणण्याकरिता अपघात स्थळी पोहोचले त्यांनी खुल्या विद्युततारा रोडवर बघितल्यावर याबाबतची माहिती नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांना दिली.


मुनोत यांनी तात्काळ श्रीकृष्णनगर येथील अपघातस्थळ गाठले तीन दिवसांपासून खुल्याJ तारा कशा का पडून आहेत याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी महावितरण वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता शेन्डे यांना मोबाइलवरून विचारणा करून तात्काळ विद्युततारा कापण्या करिता लाइनमनला पाठविण्याबाबत सूचना दिल्या असता रात्री ११ वाजता लाईनमन घोरपडे व कुमरे यांनी येऊन रोडवर पडलेल्या विद्युततारा कापून बाजूला टाकल्या या विद्युततारा कापल्या गेल्या नसत्या तर पुन्हा कुणाचा अपघात मात्र न नक्कीच झाला असता.

पिंपळगाव नांदाफाटा हा रोड नेहमीच वर्दळीचा आहेत असे असताना सुद्धा कोणत्याही नागरिकांनी विद्युततारा रोडवर पडून असतानासुद्धा विद्युत वितरण कंपनीकडे तक्रार केली नाही  कोणालाही याबाबत माहिती दिली नाही हे आश्चर्यच आहे.

नागरिक स्वतःचा जीव मुठीत घालून विद्युतताराखालुन येजाे करीत होते रमेश याच्या अपघाताला विद्युत विभागच जबाबदार असुन दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करण्याचे धाडस अधिकारी करतील का प्रश्न पडतो.