विदर्भ मराठवाड्याच्या नदीकाठावरील परिसरात भूकंपाचा 3.9 तीव्रतेचा धक्का : ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर येऊन बसले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ मराठवाड्याच्या नदीकाठावरील परिसरात भूकंपाचा 3.9 तीव्रतेचा धक्का : ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर येऊन बसले

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 

नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावरील हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, अर्धापूर, किनवट, ढाणकी, माहूर, महागाव, मांडावी, कोल्हारी, इस्लापूर आदींसह अनेक ठिकाणच्या शहर व ग्रामीण भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून, काही ठिकाणी तर जमिनीतून गडगडल्यासारखे आवाज आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले, असून, किनवट माहूर परिसरात काही घरच छत कोसळल्याचे छायाचित्र सोशियल मीडियावर फिरत आहेत.


मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी व सर्व सामान्य नागरिक आनंदी होते, सायंकाळी जेवण करून बसले असता गटारीला ९.१६ मिनिटांनी तर काही ठिकाणी ९.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला  तर शेलोडा, धानोरा, कराल, फुले नगर यासह सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक भीतीपोटी घराबाहेर बसले आहेत. 

काही गावचे नागरिक भाकंपाचं भीतीने ठीक ठिकाणी आपल्या नातेवाईकांना संपर्क करून हाल – हवाल विचारण्यात मग्न झाल्याचे चित्र दिसून आले आहे. तर अनेकजण उकड्ड्यापासून दिलासा मिळावा म्हणून घराबाहेर व छतावर झोपले असता भूकंपाच्या धक्क्याने घाबरून खाली आहेत. तर घरामध्ये जेवण करण्यासाठी बसलेले काही नागरिक जेवण सोडून बाहेर पळून आल्याचे नागरिक सांगत आहेत. 

तर किनवट तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने घराचे छत पडल्याचे छायाचित्र सोशियल मीडियावर फिरत आहेत. याबाबत अधिक माहिती साठी प्रशासनाकडे विचारानं केली असताना अधिकार्यांकडून दुजोरा मिळाला नसला तरी भूकंपाचा धक्का जवळपास शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना जाणवला येऊ खरे आहे.

विदर्भातील आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवले. टीव्ही पाहणार्या, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या.

चिचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर, कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा येथेसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली