राज्यात वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या : चंद्रपूर वाहतूक निरीक्षकांचाही समावेश : बदलीत 3नवीन निरीक्षक रुजू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यात वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या : चंद्रपूर वाहतूक निरीक्षकांचाही समावेश : बदलीत 3नवीन निरीक्षक रुजू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर 

जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या झालेल्या बदल्यांच्या पाठोपाठ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 


यात चंद्रपूर कार्यालयातील तीन वाहतूक निरीक्षकांचा समावेश आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात श्री. नरसांडे, श्री. सोनोने आणि श्री. सातके हे मागील काही वर्षापासून वाहतूक निरीक्षक म्हणून काम करीत होते. 

राज्य शासनाने वाहतूक निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या केल्या आहेत. यात नरसांडे यांची अमरावती, सोनोने यांची नागपूर ग्रामीण, तर सातके यांची अमरावती येथे बदली करण्यात आली आहे. 

या अधिका-यांच्या ठिकाणी वर्धा येथून साळुके, विशाल भोवटे आणि गोंदिया येथून आनंद मेश्राम रुजू झाले आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नवीन तीन वाहतूक निरीक्षक नियुक्त झाल्याने आता कामाला वेग येणार काय