कोरपना नगर पंचयातीत घनकचरा व्यवस्थापन कामात 27 लाखाचा भ्रष्टाचार : दोषीवर कारवाई करण्याची विरोधी नगरसेवकांची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना नगर पंचयातीत घनकचरा व्यवस्थापन कामात 27 लाखाचा भ्रष्टाचार : दोषीवर कारवाई करण्याची विरोधी नगरसेवकांची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - 

कोरपना नगर पंचायत मध्ये घनकचरा व्यवस्थापन कामात गत 3 वर्षांपासून ठेकेदार, पदाधिकारी व अधीकारी यांच्या संगनमताने मोठा गैरव्हार झाला  असल्याने ! अभियानाचा फज्जा उडाला असल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीला चुना लागला आहे,त्यामुळे शासनाचा मुख्य उद्देशच असफल झाला असल्याने दोषीवर कारवाईची मागणी विरोधी नगरसेवकांनी केली आहे.


सन 2016 मध्ये घनकचरा व्यवस्थापन कामाचे  अंदाजपत्रक नसताना सुद्धा नगर पंचयतने 13 लाखाचा निधी खर्ची घातला आहे ,परंतु सदर काम कोणत्या ठेकेदारामार्फत करण्यात आले,व या कामावर किती मजूर होते या बाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

मग 14 वित आयोगाचा निधी शाखा अभियंता व मुख्याधिकारी यांनी खर्चला मान्यता कशी दिली अशा प्रश्न उपस्थित झाला आहे, सन 2017-18 या वर्षी अर्चना  कन्ट्रॅशन या कंपनी सोबत नगर पंचयतने करार करून घनकचरा व्यवस्थापन कामाकरिता 14 वित आयोगाच्या निधीतून 22 लाख 71हजार 747 रुपयाला मान्यता देण्यात आली,परंतु  अंदाजपत्रका मध्ये नमूद केलेल्या मजुराला किमान वेतन कायद्याची पायमली करीत ठेकेदारांनी अल्प वेतन देऊन त्यांचे  शोषण केले आहे तसेच त्यांना इ पी फ ची रक्कम देण्यात आली नाही,तसेच सदर कामावर वापरण्यात येणाऱ्या वाहन सुद्धा  पूर्ण वेळ 12 महिने चालविण्यात आले नाही.

   
सन 2018-19 मध्ये घनकचरा व्यवस्थापन कामाकरिता  प्रशासकीय मान्यता दि 01/06/2018.नुसार 14 वित आयोग निधी अंतर्गत 3 1लाख 22हजार 579 र खर्चला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली,यामध्ये   नालीतील गाड, कचरा, होटेल, व्यापारी संस्था,शासकीय कार्यालय, मंगल कार्यालय, येथील ओला व सुखा कचरा घंटागाडीने डम्पिंग ग्राऊंनवर पोहचविण्याची मान्यता दिली होती, या कामासाठी 10 घंटागाडी,17 वार्डात चालविण्याचा करार असताना फक्त 7 घंटागाडी मार्फत काम सुरू आहे.

तसेच या कामासाठी 10 कामगाराची तरतूद होती परंतु फक्त  5 मजूर प्रत्यसात कामावर आहे, तसेच या मजुराला इ पी एफ ची रक्कम मजुरांना देण्यात आली नाही, तसेच वाहतूक कामात सुद्धा गैरव्हार करण्यात आला आहे, ,वार्डात कचरा कुंडी कुढे ठेवण्यात आली या बाबत कोणताच ठावठिकाणा नाही,सार्वजनिक शौचालय बांधकाम सुद्धा निकृष्ट दर्जेचे बांधण्यात आले.

तसेच ओला व सुखा कचऱ्यापासून कोणतीच खत निर्मिती करण्यात आली नाही,  ठेकेदारांनी अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या विश्लेषणानुसार व अटी व शर्ती चे पालन न करता शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला आहे,व यावर  नगर  पंचायत समिती चे सुद्धा जाणीव पूर्वक दुर्लक्ष राहिले आहे,यामुळे महाराष्ट्र स्वच्छ अभियानाचा फज्जा उडाला असून शहरात घाणीचे साम्राज्य आहे.

यामध्ये ठेकेदार ,पदाधिकारी, व अधीकारी जबाबदार असून या कामाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी नगरसेवक सुहेल अली, सुभाष तुरणकार, रेखा चन्ने, यांनी केली असून जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली आहे,