घुग्गुस येथील योगेश प्रकाश जाधव यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करा : महाराष्ट्र राज्य धोबी महासंघाची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घुग्गुस येथील योगेश प्रकाश जाधव यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करा : महाराष्ट्र राज्य धोबी महासंघाची मागणी

Share This
खबरकट्टा / यवतमाळ - चंद्रपूर :
घुग्गुस येथील योगेश प्रकाश जाधव यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करून व शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यात स्वतः शरण गेलेल्या आरोपी प्रभुदास दुर्गे व कृष्णा दुर्गे यांनी पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याने त्वरित पुन्हा तपास सुरु करून मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणीमहाराष्ट्र राज्य धोबी महासंघाचे प्रदेशयुवा उपाध्यक्ष श्री रोहित तुराणकर यांनी आज पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देऊन केली आहे.
                   


निवेदनानुसार सविस्तर असे की हत्या झालेल्या योगेश प्रकाश जाधव रा.विद्या टाकीजवळ घुग्गुस ,वय २३ वर्षे , यांचे मागील तीन चार वर्षापासून वार्ड क्रं. २ कोडा मैदान जवळ राहणार्या कु.आरती प्रभुदास दुर्गे , वय २३ वर्षे, हिच्याशी प्रेम सुरु होते, परंतु काही महिन्यापूर्वी या दोघांचे प्रेम असल्याबाबत मुलीच्या वडिलांना माहित झाल्यामुळे त्यांनी मुलीचे इतरत्र लग्न लावून देण्यासाठी मुल शोधणे सुरु केले,त्यामुळे मुलीने योगेशला हि माहिती दिली, व तू माझ्यासोबत लग्न कर म्हणून तगादा लावला.

परंतु मुलीच्या वडिलाने तिचे लग्न वणीच्या एका मुलाशी जुळविले, हि गोष्ट योगेशला माहित झाल्यावर त्याने मुलीशी बंद केले,मात्र घटनेच्या एक दिवसा आधी मुलीने योगेश ला फेसबुक वर भेटण्यासाठी ये असे वारंवार सांगितले असता,दि. १२ मी २०१९ लात्यांचा भेटण्याचा वेळ ठरला होता, योगेश घुग्गुस वरून बाहेर जाण्यापूर्वी घुग्गुस च्या बसस्थानकावर नागेश गोविंद तुराणकर याच्याशी तो अंदाजे दुपारी तीन वाजेपर्यंत होतानंतर नागेश बाहेर गेला असता काही वेळाने परत घुग्गुस बस स्थानकावर आला असता योगेश जाधव तिथे नव्हता तेव्हा नागेशने फोन केला असतात्याने ने मी नायगावला बाईक ठेवली आहे, व मी वणी जाणार होतो, पण काही कारणास्तव मी चारगाव पर्यंत आरती सोबत आलो आहे असे सांगितले .

त्यानंतर हेमराज चंपक बावणे ह्या मित्राला फोन आला होता, त्या फोनवर योगेशने सांगितले होते कि मी असे सांगितले तेव्हा हेमराज चंपक बावणे ने तू का तिचे सोबत गेला ? असा प्रश्न केल्यावर , मी आता नायगावला आलो आहे आहे व माझ्या मागे सहा लोक माझा पाठलाग करीत असल्याचे सांगताच लगेच त्याला मारण्याचा आवाज फोनवर आला, त्यामध्ये योगेश मारणार्याला म्हणाला कि"दीपक अण्णा ' मुझे मत मारो 'मी उनके घर्जाकार माफी मांगता हु " नंतर फोन बंद झाला.

या प्रकरणामध्ये जे प्रभुदास दुर्गे व कृष्णा दुर्गे हे आरोपी म्हणून शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये स्वताहून शरण गेले,ते मुख्य आरोपी नसून योगेश प्रकाश जाधव याला मार्ण्यार्यांचीसं संख्या ६ ते ७ असल्याचे फोनवरील स्पष्ट होते, त्यामुळे योगेश जाधवची हत्या करणार्या मुख्य हात्याराना ज्यांनी योगेश ला मारण्याची सुपारी मुलीच्यावडिलांकडून घेतली त्यांना वाचवण्यासाठी वडिलांनी व भावांनी तो गुन्हा स्वतावर घेतला आहे.

कारण योगेश ला जर मुलीच्या वडिलाने आणि मुलीच्या भावाने मारले तर त्यांना सुधा कुठेतरी जखमा झाल्या असत्या किंवा त्यांचे कपडे रक्ताने माखले असते , परंतु मुलीच्या वडिलाने व भावाने  हि हत्या स्वता केली असल्याचा बनाव केला आहे,व सुपारी घेणार्या गुंड प्रवृत्तीच्या दीपक अण्णा व त्यांच्या गंग ला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे विशेष म्हणजे या प्रकरणात शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने व आरोपी प्रभुदास दुर्गे व कृष्णा दुर्गे यांना कोर्टाने जेलमध्ये पाठविल्याने काह्रे आरोपी पडद्या आड गेलेले आहे, त्यांचा शोध घेण्यासाठी तथाकथित सुपारी देणारे आरोपी दुर्गे यांची पोलीस कोठडीत ठेऊन तपास करणे  आवश्यक आहे.

याकरिता आपण त्वरित मुख्य आरोपीचा शोध लावावा अन्यथा डेबुजी बिग्रेड व महाराष्ट्र राज्य तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.