उद्या चंद्रपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा महाआक्रोश मोर्चा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उद्या चंद्रपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा महाआक्रोश मोर्चा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
राजुरा येथिल काॅन्वेंट स्कुल येथील आदिवासी मुलींचे लैंगिक अत्याचाराचे विरोधात चंद्रपुर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे नेतृत्वात दि. 6/5/2019 रोज सोमवारला दु.12 वा. विर बाबुराव शेडमाके शहीदभुमीवरुन  हा आक्रोश मोर्चा करण्यात येत आहे. 


हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकनार आहे.  मोर्चातुन प्रमुख्याने अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या सुभाष धोटे व विजय वड्डेटीवार यांना तात्काळ अटक करण्यात यावी. व सुभाष धोटे यांचेवर आरोपी म्हनुन गुन्हा दाखल करण्यात यावे.  

संस्थेचे सचिव अरुन धोटे यांना नगराध्यक्ष पदावरुन निलंबित करण्यात यावे व आरोपी म्हणुन गुन्हा दाखल करण्यात यावे , नामांकित वकील नेमण्यात यावे, पिढीतांचा पुनर्वसन करण्यात यावा, आदिवासींच्या सर्व वसतीगृहाची चौकशी करण्यात यावी, आदिवासी विकास विभागाचे सबंधित अधिकऱ्यांना निलंबीत करण्यात यावे. 

या प्रामुख्याने मागण्या करण्यात येनार आहेत. पिढीतांना न्याय मिळवुन देण्यासाठी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे.असे आव्हान आदिवासी विद्यार्थि कृती समितीच्या वतीने  करण्यात येत आहे.