सुमठाणा येथे ग्रामगीता तत्त्वज्ञान विचारमंथन सोहळा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुमठाणा येथे ग्रामगीता तत्त्वज्ञान विचारमंथन सोहळा संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा ग्रामीण -
    
श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकरी सुमठाणा चे वतिने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचार व साहित्य प्रचार निमित्ताने सुमठाणा येथे ग्रामगीता तत्त्वज्ञान विचारमंथन सोहळ्याचे व जेष्ठ सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रिय प्रचार विभाग गुरुकुंज आश्रमचे सदस्य ॲड.राजेंद्र जेनेकर होते, उदघाटन सौ.नलिनी बोबडे सरपंच यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून मोहनदास मेश्राम ग्रामगीता परिक्षाप्रमुख,जाहिर खान,प्रा.राजेंद्र मालेकर, आबाजी ढवस,देवराव परसुटकर,पहानपटे मुख्या, नरेंद्र येरणे, रामदास चौधरी प्रचारक, रविंद्र बोरकुटे, गंगाराम जगताप, हरिश्चंद्र मोहुर्ले,रमेश भोयर, सौ.चंद्रकला ढवस आदींची उपस्थिती होती,प्रास्तविक वामनराव देवतळे शाखाध्यक्ष यांनी केले. 

यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर सेवा मंडळाचे स्वागत फलकाचे अनावरण मोहनदास मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाध्यक्ष ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार व प्रसार कार्याबाबत विचार व्यक्त केले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्य व विचारांचे अनुकरण करुन युवकांनी सेवा मंडळाचे कार्यात पुढे यावे असे आवाहन केले.जाहिर खान,प्रा.मालेकर,पहानपटे सर यांनी समयोचित विचार व्यक्त केले. मोहनदास मेश्राम यांनी ग्रामगीता जीवन विकास परिक्षा विभागाचे कार्याचा अहवाल सादर केला.याप्रसंगी भाऊजी देवतळे,श्रावण बोबडे,भाऊजी झाडे या जेष्ठ नागरिकांचा सत्कार पाहुण्यांचे हस्ते ग्रामगीता देवून करण्यात आला.

सुत्रसंचलन शरद नगराळे यांनी तर आभार देवानंद झाडे सचिव यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शंकर बल्की,प्रभाकर डेरकर,राजेश येरणे,प्रविण देवतळे, भिवसन बोरुले,कालींदा सातघरे महिलाप्रमुख, कमला डेरकर,उद्धवराव भोजेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.