खबरकट्टा / चंद्रपूर : शैक्षणिक (विशेष बातमी )
प्रत्येक आई-बाबांचे स्वप्न असते कि त्यांच्या मुला-बाळांनी कॉन्व्हेंट मध्ये शिकावे.उच्च शिक्षीत होऊन मोठं नाव कमवावे. त्याकरिता कितीही गरीब का असेना आई-बाबा मुलांच्या शिक्षणा करिता जीवाचे रान करून आपल्या मुलांना कॉन्व्हेंट मध्ये शिकवितात.
मागील 15-16 वर्षांपासून आपल्या मुलांना कॉन्व्हेंट मध्ये शिकवण्याचं एक खास ट्रेंड सुद्धा आला आहे. जे कुटुंबीय आपल्या पाल्याना कॉन्व्हेंट मध्ये शिकवीत नाहीत त्यांना लोक मागासलेले समझतात. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेच्या शाळे मध्ये जे शिक्षक शिकवीत असतात त्यातले 90 टक्के शिक्षकांचे मुलं हे कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेत असतात हे के वास्तव्य असून कोणीही याला नाकारू शकत नाही.
कॉन्व्हेंट मध्ये प्रवेश घेते वेळी अमाप डोनेशन, महिन्याकाठी भरमसाठ फीस त्या व्यतिरिक्त 3-4 प्रकारचे युनिफॉर्म, पुस्तके, बॅग, वॉटर बॅग पासून तर जोड्या पर्यंत सर्वच वस्तू कॉन्व्हेंट मधूनच खरेदी करावयाचे असतात. त्यात कॉन्व्हेंट संचालक खरेदीत कोणतीही सूट देत नाहीत. हे कॉन्व्हेंट एका प्रकारे हे सर्वसामान्य जनतेच्या लुटीचे अड्डे बनले असून आपणही सर्व माहित असून सुद्धा मोकाटयाने हे सर्व सहन करीत आहोतच.
बहुतेक सर्वच पालक आपल्या मुलांना नर्सरी पासून पासून कॉन्व्हेंट शिकवितात. केजी वन, केजी टू असा हा मुलांचा शिक्षणाचा प्रवास व पालकांचा आर्थिक लुटीचा प्रवास सुरू असतो. त्या लुटीत कॉन्व्हेंट मध्ये तुटपुंज्या पगारामध्ये काम करणारे शिक्षक आमच्या कडेच ट्युशन लावण्याचा दबाव करीत ते सुद्धा पालकांना आर्थिक कोंडीत जकळत असतात.
सर्व काही व्यवस्थित सुरु असते आणि केव्हा हि मुले कॉन्वेंट मध्येच प्राथमिक शिक्षण घेऊन हायस्कुल मध्ये प्रवेश करतात. जेव्हा मुले सातवीत प्रवेश करतात तेव्हा पासून शिक्षणात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांना तुमचा पाल्य शिक्षणात कमजोर आहे अशी विनवणी करीत असतात. पालकही वाटेल तिथे ट्युशन लावून आपला मुलगा हुशार व्हावा त्याकरिता प्रयत्नशील असतातच.
पण ज्या प्रमाणे पाचही बोटे सारखी नसतात त्याच प्रमाणे कॉन्व्हेंट मध्ये शिकणारी सर्वच मुलेही हुशार नसतात. नेमकी हीच बाब हेरून संस्था चालक आणि शिक्षक या कमजोर विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या शाळेचे 100 टक्के निकालाची कृत्रिम प्रक्रियेला अडथळा तर होईल नाही ना म्हणून आठवी-नववी नंतर विद्यार्थ्यांच्या पाल्याना बोलावून जबरदस्तीने टी सी देऊन मोकळे होतात.
जिल्ह्यातील विविध मोठ्या कॉन्व्हेंट्स मध्ये असे अनेक प्रकार दरवर्षी उघडकीस येतात परंतु आपल्या मुलाच्या भविष्याच्या व नवीन ठिकाणी दाखला मिळण्याच्या चिंतेने कुणीही तक्रार करण्यास समोर येत नाहीत हे वास्तव आहे.अशी व्यथा टीम खबरकट्टा सोबत बोलताना एका उच्च अधिकारी पीडित पालकाने मांडली असता अनेक शिक्षकांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
आता नापास होणारा विद्यार्थीच कॉन्व्हेंट मध्ये नाही राहिला तर 100 टक्के निकाल लागणारच. हे कॉन्व्हेंट चालक नर्सरी पासून ते नववी पर्यंत पाल्यांचे आर्थिक शोषण करीत असतांना त्यांच्या कॉन्व्हेंटच्या 100 टक्के निकालाच्या हवाश्या पोटी पाल्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मात्र वाटोळे लावतात.
फॅशन कोचिंग इन्स्टिटयूट ची : वाचा लवकरच ......