ब्रेकिंग न्यूज : राकेश इरकुलवार यांची हत्या की आत्महत्या : राजुरा शहरात आणखी एका युवकाने गमावला जीव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : राकेश इरकुलवार यांची हत्या की आत्महत्या : राजुरा शहरात आणखी एका युवकाने गमावला जीव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा )

शहरातील सोमनाथपूर वॉर्ड येथे मटण मार्केट समोरील वस्तीत राहणाऱ्या राकेश इरकुलवार(वय अंदाजे 36) यांच्या मृत्यू ची घटना आज रात्री 9:00 वाजता उघडकीस आली असून प्रथमदर्शनी त्यांच्या घराची पाहणी केली असता एक फाशीचा दोर घरच्या छताला टांगलेल्या अवस्थेत असून त्यांनी फाशी लावून आत्महत्या केली असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे . गळफास घेतलेल्या व्यक्तीला पोलीस पथक पोहोचायच्या आतच  फास सोडून घरातील खाटेवर लेटविण्यात आले असून यामुळे अनेक शंका कुशंकांना शहरात  पेव फुटले आहे.

वृत्त लिहेपर्यंत पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले नसून घरघुती वादातून आजच पत्नी लहान मुलीसह घर सोडून गेल्याची परिसरात चर्चा आहे. 

अधिक माहिती लवकरच ......