वाघ व अस्वलाच्या हमल्यात तेंदूपत्ता मजूर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघ व अस्वलाच्या हमल्यात तेंदूपत्ता मजूर जखमी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - सिंदेवाही 

चिमुर तालुक्यातील अमरपूरी गावाच्या जंगलात तेंदूपत्ता तोडताना अस्वलाने केलेल्या हल्ल्यामध्ये दोन तेंदूपत्ता संकलक गंभीर जखमी झाले तर सिंदेवाही तालुक्यातील विठलापूर गावाच्या जंगलामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एक वनमजूर जखमी झाला असल्याचे वृत्त आहे.


अस्वलाच्या हल्ल्यात जखमी ची नावे विठ्ठल कीचू रणदिवे वय 50 व बाजीराव भिका रणदिवे राहणार अमरपुरी महसुली असे असून वाघाच्या हल्ल्यातील जखमी दादाजी पाटील बोरकर  राहणार जतलापुर तालुका सिंदेवाही असे आहे विठ्ठल रणदिवे हे या हल्ल्यात गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .