बाबुपेठ परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव : ग्लास कंपनीची लीज परत घ्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाबुपेठ परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव : ग्लास कंपनीची लीज परत घ्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी :
शहरात मनपाकडून अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र शहराला लागून असलेल्या चांदा नझुलमोहल्ला-बाबूपेठ परिसर मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या परिसरातील वास्तव्यास असणा-या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


त्यामुळे परिसरातील समस्या सोडविण्याची मागणी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली आहे. चांदा नझुलमोहल्ला-बाबुपेठ येथील शिट नं. २ ब्लॉक नंबर १०४ न. भु. क्र. १४७५० ही शासकीय नझुल सरकारी जमीन एसजी ग्लॉस कंपनीला काच फॅक्टरीकरिता लिजवर देण्यात आली होती. मात्र ही कंपनीबंद पडली. मागील ६०-७० वर्षापासून शासकीय नझुल सरकारी जमिनीवर अनेक दारिद्रय रेषेखालील कुटुंब वास्तव्याला आहेत. मात्र मूलभूत सुविधा नाही. कुटुंबांना स्थायी घरपट्टे देण्यात आले नाही. 

घरटॅक्स पावती व एकाही सार्वजनिक शौचालय नाही. नाल्या नसल्याने पावसाळ्यात घाण साचते. त्यामुळे नागरिकांना विविध अडणींचा सामना करावा लागत आहे. शासकीय नझुल जमिनीची लिज रद्द करावी व मानवी हक्कानुसार सुविधा देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.