धानोली(तांडा) येथे आरोग्य शिबीर संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धानोली(तांडा) येथे आरोग्य शिबीर संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान समावेश  असलेल्या ग्रामपंचायत धानोली(तांडा)
येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिराचा लाभ एकूण 128 रुग्णांनी घेतला त्या मधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी 29 रुग्ण व चष्मे साठी 25 रुग्णाची नोंद झाली आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ रणदिवे तसेच मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ. संदीप घोन्सिकर सर,गट विकास अधिकारी कोरपना,डॉ.सचिन नळे.ता.वैद्यकीय अधिकारी,डॉ.घुंगे डॉ.शालिनी तरोने मॅडम(वैद्यकीय अधिकारी मांडवा,डॉ.रंजन बदरे वैद्यकीय अधिकारी नारंडा,डॉ .कल्पना भेंडे अंबुजा फाउंडेशन,श्री चाहादे आरोग्य सेवक,गीते सर,धुपे मॅडम,पालशिवें मॅडम सौ. साधना दिवटे(सचिव) श्री.सुपडा वानखडे ग्रामप्रवर्तक, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर,गावातील महिला,किशोरवयीन मुली,युवक वर्ग,पुरुष मंडळी तसेच समस्थ नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करुन करण्यात आली.तसेच सर्व मान्यवरांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच विजय रणदिवे यांनी केले,डॉ घोंन्सीकर सरांनी व डॉ.सचिन नळे सरानीं लोकांना मार्गदर्शन केले.नंतर वेगवेगळ्या विभागा मध्ये लोकांचे वर्गीकरण करून  तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये मोतीबिंदू तपासणी,हिमोग्लोबिन तपासणी,रक्तदाब व शुगर तपासणी तसेच सामान्य तपासण्या करण्यात येऊन ओषधी देण्यात आली.अंबुजा फाउंडेशन नि शिबिरामध्ये ओषधी पुरवून चांगल्या प्रकारे मदत केली.

सर्व रुग्णांना अल्पोआहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.डॉ.शालिनी तरोने वैद्यकीय अधिकारी मांडवा यांनी गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन विषयी सविस्तर माहिती दिली.महिलांना होणारे आजार,मासिक पाळी,त्या पासून घेण्यात येणारी काळजी या बाबद सविस्तर मार्गदर्शन केले.व गावातील एकूण 97 महिला व मुलींना पॅड वाटप करण्यात आले.सदरील शिबिराचे सूत्रसंचालन सुपडा वानखडे ग्रामप्रवर्तक यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनीता सूर अंगणवाडी सेविका यांनी केले.