राजुरा येथील आदिवासी धरणे आंदोलनाला भेट देऊन मनोबल वाढविण्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथील आदिवासी धरणे आंदोलनाला भेट देऊन मनोबल वाढविण्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला प्रयत्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा )-

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज दिनांक 8 मे 2019 रोजी राजुरा येथिल अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार घडलेल्या वसतिगृहाला व आदिवासी बांधवांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिली.


अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार समाजाला काळीमा फासणारी असून उपस्थित असलेल्या समाज बांधवांच्या समस्या जाणून घेत वरिष्ठ पातळीवरून तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले.


सोबतच पीडितांची भेट घेऊन सविस्तर माहिती जाणून  आणि दोषींवर लवकरात लवकर कशा पद्धतीने कारवाई करता येईल यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन विभागाला चौकशीचे आदेश देणार असल्याचे सांगितले.


त्यानंतर विश्राम गृह राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकरणात महिला आयोगाची भूमिका व महिलांचा अपमान करणाऱ्या सुभाष धोटे यांच्या वक्तव्याला अत्यंत गांभीर्याने दखल घेत त्यांच्यावर आयोगातर्फे बसविण्यात आलेली चौकशी व  अत्याचारग्रस्त मुलींची योग्यरीत्या दखल घेण्यात येणार आहे त्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून प्रयत्न केल्या जाईल असा विश्वास दिला.