गडचांदूरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

दिवसेंदिवस आरोग्याचे प्रश्नात वाढ होत असताना उपचार देखील महाग होत चालला आहे. ही आरोग्यविषयक निकड लक्षात घेऊन गडचांदूर येथे २१ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. जिवती व कोरपना तालुक्यात वात, बीपी, मूळव्याध, दमा, मायग्रेन, थायरॉईड, मधुमेह, त्वचेचे विकार आदी व्याधींनी थैमान घातले आहे. नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी सोडविण्यासाठी २१ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान गडचांदूर येथील माता मंदिराजवळ असलेल्या चटप क्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजिले आहे.


या आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी ९७६४२५२०४६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर नाव नोंदणी करावयाची आहे. 

आरोग्य विषयक तक्रारी सोडविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. जयदीप चटप यांनी केले.

आरोग्यविषयक सामाजिक जाणीवा जागृत ठेवून ग्रामीण भागात जास्तीत जास्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले पाहिजे. आरोग्याच्या समस्या सोडविणे हा व्यवसाय नसून एक जनसेवेचे माध्यम आहे. आपला चरितार्थ सांभाळत समाजपयोगी कार्य करणे गरजेचे असल्याने या शिबिराचे आयोजन केले असल्याचे मत डॉ. जयदीप चटप यांनी व्यक्त केले.