प्रकाशवाटा -डाॅ.प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित युवा कवी आदित्य आवारी यांची रचना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रकाशवाटा -डाॅ.प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित युवा कवी आदित्य आवारी यांची रचना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : साहित्य -

प्रकाशवाटा 
ठेवूनी ध्यानी-मनी फक्त 
बाबांच्या कर्माची गोडी, 
हेमलकशास उभारण्या
सोडीली आनंदवनाची गोडी! 

आनंदवना बाहेरच्या जगात जाऊन 
हेमलकशात वास्तव केले,
भूतकाळातील खडतर प्रवासाने
रोग्यांसाठी भविष्य सोपे केले! 

घेऊनी वैद्यकीय शिक्षण 
केली कृष्ठरोग्यांची सेवा,
आदिवासी बांधवांना दिला
माणूसकीने जगण्याचा मेवा! 

साप,विंचवांच्या सानिध्यात 
केले कृष्ठरोग्यांवर उपचार, 
महारोग्यांची सेवा करण्यास
आयुष्यात सोसला संकटांचा भार!

शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या ताई 
कुष्ठरोग्यांच्या सेवेत रमल्या,
तुमच्या खांद्याला खांदा लावूनी
मंदा ताईंनीही संकटांच्या झडा सोसल्या! 

स्वतः घेतली सेवेची जबाबदारी 
साऱ्यानी मिळूनी ती पार पाडली, 
अतिदुर्गम भागात स्थलांतर होऊनी
रोग्यांसाठी प्रकाशाची लाट सोडली!

घोटभर पाण्यावाचून तळमळणाऱ्या
आदिवासींना दिली मायेची हाक,
घासभर अन्नावाचून तडपडणाऱ्या
आदिवासींना पाजले प्रेमाने ताक! 

तुमच्या एका माणुसकीच्या स्पर्शाने
रुग्णांच्या वेदना विरघळतात, 
होरपळणाऱ्या रुग्णास तुम्ही
जगण्याची नवी दिशा दाखवितात!

साध्या-सुध्या आयुष्यात जगतांना
कधिच ना पडला श्रीमंतीचा मोह, 
समाजसेवा करण्यास तुम्ही धरिला 
रुग्णास जगविण्याचा मनपासूनी मोह! 

अदम्य इच्छा शक्तीतून आपली
आरोग्य सेवा विस्तारत गेली, 
आदिवासींचा मिळवलेला विश्वास 
यातूनही सदा सेवा विस्तारत गेली! 

जीवघेण्या प्रसंगावर आपण 
केलेत रोग्यांसाठी दोन हात, 
समाज सेवेत आयुष्य ओतून 
आपण घालवून दिला वस्तुपाठ!
  
     ---आदित्य दिनकर आवारी 
          ९६०४०००९७६/८८३०३९१४४७
        adityaawari47@gmail.com