विवाह प्रसंगी दिला सडक सुरक्षेचा संदेश : नांदा येथील तरुणांची सामजिकता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विवाह प्रसंगी दिला सडक सुरक्षेचा संदेश : नांदा येथील तरुणांची सामजिकता

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

लग्न समारंभ म्हटलं की डीजे नाच गाना, अंधाधून पैशाची उधळण मात्र या आधुनिक जमान्यात काही युवक आपल्या लगीन समारोह व स्वागत समारोह या शुभ प्रसंगी, झाडे लावा झाडे जगवा, रक्तदान श्रेष्ठदान, तुकडोजी महाराज यांचे विचार म्हणजेच ग्रामगीता तसेच शिवछत्रपती महाराज यांची प्रतिमा भेटवस्तू  देऊन  विविध ठिकाणी आगळावेगळा सामाजिक संदेश देत सोहळा साजरा केल्या जात आहे. नांदा या गावातील तरुणाने आपल्या विवाह प्रसंगी हेल्मेट वाटप करून सडक सुरक्षेचा संदेश दिला.

नांदा येथील तरुणाने आपल्या लगीन शुभारंभप्रसंगी संदेश देण्याचा जणूकाही वसा घेतला आहे. रक्तदान श्रेष्ठदान, झाडे लावा झाडे जगवा, यानंतर मंगेश प्रभाकर जेनेकर या तरुणाने आपण व्यवसाय आटोमोबाईल चा व्यवसाय करीत असल्याने, नेहमी त्यांचा कडे तरुण मंडळी आपली दुचाकी दुरुस्त करण्याकरिता येत असत विचारल्यास गाडी वरून पडलो. नाही तर माझा अपघात झाला असे युवक सांगत.


मंगेश नी विचारकरत आपल्या विवाहा प्रसंगी हेल्मेट वाटप करण्याचा निर्धार केला एवढेच नाही तर आपल्या लगीन पत्रिका मध्ये सुद्धा सडक सुरक्षा बद्दल संदेश दिला


  
आपल्या लगीन समारंभ त्यांनी तरुण मंडळींना 21 हेल्मेट वाटप करून, गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा, आपली सुरक्षा म्हणजेच घरच्यांची सुरक्षा, असा आगळा वेगळा सामाजिक संदेश देत मंगेश ने आपला विवाह साजरा केला.