चंद्रपूर अवैध सावकारी जाळपोळ प्रकरणातील पीडित कल्पना हरिणखेडे यांचा दुर्देवी मृत्यू : अजूनही आरोपीस अटक नाही - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर अवैध सावकारी जाळपोळ प्रकरणातील पीडित कल्पना हरिणखेडे यांचा दुर्देवी मृत्यू : अजूनही आरोपीस अटक नाही

Share This
खबरकट्टा / नागपूर :
14/05/2019 : 11:45AM-

चंद्रपूर येथे 7 मे 2019 ला घडलेल्या अमानवीय अवैध सावकारी प्रकणातील 60%जळालेल्या कल्पना हरिणखेडे यांचा नागपूर येथे उपचारांती आज सकाळी 11:30वाजता मृत्यू.

आरोपी जसबीरसिंग उर्फ सोनू भाटियाला अजूनही अटक झालेली नाही.
---------------------------------------------------------

त्या महिलेची प्रकृती चिंताजनक : मुलगा धोक्याबाहेर : चंद्रपूर येथे अवैध सावकाराने जाळल्याचे प्रकरण 
खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी 
09/05/2019 : 8:30 PM-

व्याजाने दिलेल्या कर्जाची रक्कम परत घेण्यासाठी अवैध सावकाराने महिला व तिच्या मुलाला पेट्रोल ओतून जाळल्याची घटना दोन दिवसापूर्वी चंद्रपुरात घडली. या प्रकरणातील जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असून नागपूर येथे हलविण्यात आल्याचे व मुलगा धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे. तसेच अवैध सावकार जसबीरसिंग उर्फ सोनू भाटिया हा सुद्धा भाजला असल्याने, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 


जसबीरसिंग उर्फ सोनू भाटिया हा चंद्रपुरात अवैध सावकारी करतो .सरकार नगर येथील रघुनाथ हरिणखेडे यांनी भाटिया कडून 4लाखाचे कर्ज घेतले होते त्यापैकी चक्रवाढ व्याजासहित 1लक्ष 30हजार परत करणे बाकी होते.गेल्या काहीदिवसापासून तो हरिणखेडे यांचेकडे पैसे परत करण्याकरिता तगादा लावत होता.या वेळी दुसऱ्या दिवशी पैसे देण्यासाठी भाटिया यांना बोलाविले होते .परंतु हरिणखेडे बँकेत रक्कम काढण्याकरिता गेले असता पत्नी व मुलगा घरी होते. 

दरम्यान भाटियाने हरिणखेडे यांच्या पत्नी कविता यांचेशी वाद करण्यास सुरुवात केली व संतप्त होऊन सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल कविता यांच्या शरीरावर ओतून आग लावली. याचवेळी घरात असलेला मुलगा आई च्या बचावासाठी गेला असता तो सुद्धा भाजल्या गेला.

या घटनेनंतर स्वतः सुद्धा भाजलेला भाटिया पळून गेला दरम्यान कविता व पियुष यांना नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु होते. त्यात आज कविता यांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

मात्र जीवे मारण्याचा गुन्हा भाटिया वर दाखल होऊनही तो सुद्धा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही  मात्र रुग्णालयरून त्यालाडिस्चार्ज मिळताच अटक केली जाईल असे रामनगर पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान काल पोलिसांनी भाटिया याच्या घराची झडती घेऊन अनेक आक्षेपार्य कागदपत्रे जप्त केले असून त्याने अवैध सावकारीतून आणखी कोणाला कर्ज दिले आहे याची कसून चोकशी होणार असल्याचे संगीतले. 

------------------------------------------------------------
भयानक : पैसे वसूल करण्यासाठी गेलेल्या अवैध सावकारणाने पेट्रोल ओतून केला महिलेला जाळण्याचा प्रयत्न : स्वतः ही आगीत अडकून भाजल्या गेला 

खबरकट्टा/ चंद्रपूर :शहर प्रतिनिधी -
07/05/2019 : 2:17PM-

चंद्रपूर येथे अवैध सावकाराने ने महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. सदर घटना सरकार नगर येथील असून आज दुपारी 1:00 च्या दरम्यान घडली.

सरकार नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ राहत असलेले नगरसेवक संदीप आवारी, यांच्या घरासमोर सौ. हरीन खेडे यांच्या पतीकडे  काल सावकाराचे चे काही रक्कम शिल्लक असलेले मागायला गेले असता सौ. हरीन खेडे यानी आज सकाळी पैसे परत करून व्यवहार संपविण्याचे कबूल केले होते . 

आज  दिनांक 7 मे 2019 दुपारी तेच सावकार  पैसे मागण्याकरिता आले असता सदर महिलेने पती घरी नाही असे सांगताच त्या सावकाराने सौ. हरीन खेडे यांच्यासोबत भांडण सुरु केले , व “तू माझे पैसे दे नाहीतर मी तूला जाळून टाकणार अशी धमकी देऊ लागला आणि त्याने लगेच पेट्रोल आणून सौ. हरीन खेडे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. 

यामध्ये सौ. हरीन खेडे व त्यांच्या सोबत असलेली घरी उपस्थित असलेली आणखी एक व्यक्ती जळाली. आणि त्यांच्या घरचे सर्व सामानावर पेट्रोल छिडकावून आग लावली परंतु अचानक भडका झाल्याने यामध्ये पैसे वसुल करण्याकरिता आलेला सावकार आता अडकून पडून भाजल्या गेला .

हा सर्व प्रकार घराशेजारील लोकांनी पाहताच त्यांनी विझविण्याचा प्रयत्न केला व ताबडतोब त्यांना डॉ. पोद्दार हाँस्पिटल मध्ये दखल करण्यात आले आहे.हा सर्व प्रकार माणुसकीला काळिमा लागणार आहे त्या व्यक्ती ला ताबडतोब गुन्हा दाखल करून त्या अवैध सावकाराला अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिक करित आहे.