खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा
दिनांक २० मे रोजी चंद्रपूरला चौकशी करीता बोलावून त्यांना कोणतीही विचारपूस न करता तसेच कायदेशीर नोटीस न देता हेतूपुरस्सर व राजकीय दबाव, सुडभावनेने आॅक्टोबर २०१८ मध्ये नर्सिंग कॉलेजसी संबंधित घडलेल्या जुनी तक्रार तसेच नव्या तक्रारी वरून मुख्य आरोपीला सोडून या प्रकरणाशी काही संबंध नसताना अध्यक्ष, सचिव यांना केवळ राजकीय दबावाखाली अटक करण्यात आली.
राजुरा विधानसभा क्षेत्राताचे लोकप्रिय माजी आमदार सुभाष धोटे आणि लोकनिर्वाचित नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या लोकप्रियतेला आणि प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काही राजकीय पक्षाचे विरोधक येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र रचित आहेत असे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
तक्रार कर्त्या मुलीने दिलेल्या बयानानूसार गुन्हे दाखल न करता, मुख्य आरोपीला अटक न करता थेट संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांना नियोजन पूर्वक फसवण्याच्या बेताने जुन्या अर्धवट तक्रारी वरून कलम ३५४, ३५४ ( अ), ३५४ (ड), ५०४, ५०६(३४)भानंद्वी नुसार गुन्हा कायम करून सुडभावनेने ताबडतोब अटक केली. मुलीची अध्यक्ष व सचिव विरोधात विनयभंगाची तक्रार सुध्दा नाही तरी देखील दोघांही नेत्यांवर विनयभंगाचा गुन्हा कसा दाखल करण्यात आला?
त्यापूर्वी कोणतीही चौकशी का करण्यात आली नाही? कोणत्याही साक्षीदाराचे बयान का घेण्यात आले नाही? पोलीसांना सर्व प्रकारण माहिती असताना पोलीस कोठडी का मागीतले? ही संपूर्णपणे एकतर्फी आणि दबावाखाली करण्यात आलेली कार्यवाही आहे. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करून कारवाई करावी. सुडभावनेने कार्यवाही करण्यात येऊ नये. ही कारवाई पुर्णपणे राजकीय सुडभावनेने आणि दबावाने झालेली आहे अशी जनमानसात चर्चा आहे. यामुळे राजुरा विधानसभा काँग्रेसचे सर्व जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक दुःखी आहेत. सर्वांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही नेत्यांवरील सुडभावनेने सुरू असलेली कार्यवाही थांबवून योग्य दिशेने निष्पक्षपणे चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. अन्यथा समाजात काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक रस्त्यावर उतरून उद्रेक निर्माण झाल्यास याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.
पोलीस प्रशासनाने सुडभावनेने केलेल्या कारवाई व सत्ता पक्षाकडून पोलीस प्रशासनावर होत असलेल्या दबावाच्या निषेधार्थ राजुरा विधानसभा काँग्रेस कमेटी, राजुरा विधानसभा युवक कांग्रेस कमेटी, महिला काँग्रेस कमेटी व काँग्रेसच्या सर्व संघटनांच्या वतीने दिनांक २४ मे २०१९ ला राजुरा येथे चक्का जाम व राजुरा बंदचे आयोजन करण्यात आले आहे. तर २५ मे २०१९ नंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर काँग्रेस पक्षाचा भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन आज दिनांक २२ मे रोजी मा. उपविभागिय अधिकारी राजुरा यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार पी. बी. वैरागडे आणि पोलीस निरीक्षक गायगोले यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली.