सुभाष धोटे व अरुण धोटे ला कोणत्याही क्षणी अटक होण्याचे संकेत : खालील लिंक वर टच करा व नक्की वाचा त्यामागील कारणे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुभाष धोटे व अरुण धोटे ला कोणत्याही क्षणी अटक होण्याचे संकेत : खालील लिंक वर टच करा व नक्की वाचा त्यामागील कारणे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा येथील इन्फन्ट जीजस सोसायटीच्या नामांकित दर्जित माता अनुसया वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर समाजमन हेलावून टाकणाऱ्या, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या, गरीब आदिवासी पालकांच्या विश्वासाला तळा भेदणाऱ्या कलंकित कृत्याचे फक्त जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देशातील एकमेव अश्या घटनेत, वसतिगृहात पीडित विद्यार्थिनी वारंवार चक्कर येऊन पडत असताना काय एकही वसतिगृह अधीक्षकाने 11संचालकांचे मंडळ असलेल्या एकही संस्थाचालकाला याबाबत खरंच माहिती दिली नसेल हे कसे शक्य आहे यावर सर्वत्र शंका-कुशंकांना पेव फुटलेले आहे.


आणि जर पुसटशीही कल्पना वसतिगृह अधीक्षकाने कोणत्याही संस्थाचालकाला दिली असेल तर अश्या गंभीर बाबीवर राजकारणी असलेले संस्थाचालक कसे काय निष्काळजी राहू न बेजबाबदार पणाचा प्रत्यय देऊ शकतात??  जर अश्या पद्धतीचा निष्काळजीपणा असेल तर या  संस्था आदिवासी मुलांचे पालकत्व काय फक्त अनुदानाची रक्कम लाटण्यासाठी घेतात याही विषयाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

गंभीर गुन्हा आपल्याच संस्थेत घडूनही सुभाष धोटे आपण मात्र अनभीज्ञ असल्याचा वाव आणत पत्रकार परिषदा घेतात आणि बेताल वक्तव्य करतात असे की पिडीतांनी जणू काही हा सर्व घाट निव्वळ पैस्यासाठी मांडला आहे.पैश्याच्या वासनेचा  खरा घाट कोणी मांडला हा खरा संशोधनाचा विषय आहे???

बेताल वक्तव्यानंतर सुभाष धोटे यांचेवर 24एप्रिल 2019ला रामनगर पोलीस स्टेशन येथे अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दखल झाल्यानंतर आजपोवतो अटक न केल्यामुळे आदिवासी विद्यार्ध्यांनी काल दिनांक 6 मे 2019ला काढलेल्या भव्य आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रश्न प्रमुख्याने धरून लावला होता. सोबतच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍड संजय धोटे आणखी  5आमदारांना व  सर्व सातही पीडितांच्या पालकांना सोबत घेऊन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचेकडे तपासयंत्रणेतील ढिलाई या विषयवार लक्ष वेधून तात्काळ कारवाही ची मागणी केली.

यानंतर अट्रासिटी च्या गुन्ह्याची नोंद झाल्यावरही आरोपीचा एफ आय आर नाकारण्याकरिता किंवा जमीन मिळविण्याचा अर्ज करणे हा जरी संविधानिक अधिकार असला तरी तक्रारीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे हा मुद्दा उपस्थित झाल्यावर सुभाष धोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता आहे.

------------------------------------------------------------

अरुण धोटेवरही अटकेची टांगती तलवार :


प्रकरणातील संस्थेचे सचिव अरुण धोटे यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त जरी नसले तरीही टाइम्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राच्या मुंबई एडिशन मध्ये 'A' पासून सुरु होणाऱ्या नावाच्या एका उच्चभ्रू  व संस्थेतील एक चालक यांचे नाव पीडितेच्या बयाणात आले असल्याचा उल्लेख झाल्यामुळे या वृत्ताने शहरात खळबळ आहे. सी आय तपासातील माहिती सहजासहजी बाहेर येत नसली आणि त्यामुळे प्रकरण वरकरवी शांत वाटत असले राजुरा शहरात सि आय डी पथकाची संशयितांकडे/ संभंधितांकडे सुरु असलेली वारी यावरून  तरी कोणत्या क्षणी काय घडेल कयास लावता येणं कठीण आहे.