ब्रेकिंग न्यूज : चंद्रपूर जिल्हा परिषद कंत्राटदारांच्या फसवणुकीच्या विळाख्यात : वर्धमान इंडस्ट्रीज ने बनावट टेस्टिंग प्रमाणपत्र दाखवून घेतले कोट्यवधी रुपयाचे कंत्राट : महिन्याभरापूर्वी गुन्हा दाखल होऊनही संचालकास अटक नाही : मनसेची सि आय डी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : चंद्रपूर जिल्हा परिषद कंत्राटदारांच्या फसवणुकीच्या विळाख्यात : वर्धमान इंडस्ट्रीज ने बनावट टेस्टिंग प्रमाणपत्र दाखवून घेतले कोट्यवधी रुपयाचे कंत्राट : महिन्याभरापूर्वी गुन्हा दाखल होऊनही संचालकास अटक नाही : मनसेची सि आय डी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Share This
चंद्रपूर जि.प.च्या वर्धमान इंडस्ट्रीज  कंत्राटी कंपनी संचालकांच्या व्यवहाराची सीआईडी चौकशी करा : राजू कुकडे, मनसे जिल्हा संघटक 

खबरकट्टा / चंद्रपूर :

मागील अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्हा परिषद सह जिल्यातील अनेक शासकीय विभागामध्ये व सरकारी विभागामध्ये  साहित्य पुरवठा करणारी कंपनी जितेंद्र सुराणा (जैन ) वर्धमान इंडस्ट्रीज  कंपनी चे  नाव प्रतिष्ठेने  घेतल्या जाते. 

जिल्हा परिषदमधे स्टेशनरी पुरवठ्यापासून तर आरोग्य साहित्य,वैद्यकीय उपकरणे  तथा पंचायत विभागामध्ये ग्रामपंचायतला कचरा कुंड्या  पुरवठा करण्यासाठी एम आय डी सी स्थित   वर्धमान इंडस्ट्रीज  कंपनीला 2018 मध्ये  कंत्राट मिळाले होते. 

मात्र त्यांनी या ई-टेंडरिंग मधे पुरवठा करण्यासाठी साहित्याची गुणवत्ता अधोरेखित करण्याकरिता  आवश्यक असलेले  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया च्या प्राचार्यांचे गुणवत्ता प्रमाणपत्र  (टेस्टिंग रिपोर्ट )न घेता बनावटी प्रमाणपत्र तयार करून कंत्राट मिळविण्याकरिता वापरात आणल्याचे  जिल्हा परिषदेच्या अंतर्गत चॊकशीत उघड झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेले आरोग्य ,शिक्षण व पंचायत विभागाचे कंत्राट तात्काळ स्थगित करून देयके थांबविण्यात येऊन रामनगर पोलीस ठाणे चंद्रपूर येथे बनावट प्रमाणपत्राच्या आधारे प्रथम आरोग्य विभागाने 4 एप्रिल 2019 ला आणि पंचायत विभागाने 25 एप्रिल 2019,   वर्धमान ट्रेडिंग च्या जितेंद्र सुरांना व इतरांवर कलम 420,465,467,468,471व 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेसारख्या सर्वात मोठया स्थानिक संस्थेची फसवणूक होऊनही मात्र या प्रकरणात अजूनपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नसून पोलीस प्रशासन आरोपीला अभय देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देवून वर्धमान इंडस्ट्रीज कंपनी चे संचालक जितेंद्र सुरांना  व त्यांच्या इतर नातेवाईकाच्या कंपनीची  सीआईडी चौकशी करून त्यांच्या कंत्राटी कंपनीला  काळ्या यादीत टाका अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा पत्रकार परिषदेतून प्रशासनाला दिला आहे. 

या प्रसंगी मनसेचे राजू कुकडे. वनिता चिलके.कोटेस्वरि गोहने. पीयूष धूपे.रमेश कालबान्दे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.