रामपूर येथे राकेश मोहितकर या युवकाची आत्महत्या : कारण गुलदस्त्यात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रामपूर येथे राकेश मोहितकर या युवकाची आत्महत्या : कारण गुलदस्त्यात

Share This
खबरकट्टा / राजुरा : 

येथून तिन किलोमीटर अंतरावरील सास्ती-धोपताळा टाऊनशिप जवळील रामपुर येथे राकेश अरुण मोहितकर या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.आज दिनांक 17 मे 2019 शुक्रवारला दुपारी चार वाजता ही घटना उघडकीस आली.  

         
या तरुणाचे वडील वेकोलि मध्ये कार्यरत असुन मोहितकर कुटूंब लग्नासाठी बाहेर गेले होते. राकेश हा सुध्दा बाहेर गेला होता. परंतू तो घरी आल्यावर एकाएकी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटूंबाचा राकेश एकुलता मुलगा होता. त्याच्या वडीलांनी नुकतीच त्याला नविन मोटरसायकल घेऊन दिली होती. मोहितकर कुटूंब घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. राजुरा  पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असुन ठाणेदार बाळू गायगोले अधिक तपास करीत आहेत.