राजुरा अत्याचार प्रकरण : शाळेची मान्यता काढण्याव्यतिरिक्त संचालक मंडळ हटवून इतर पर्यायी व्यवस्थापनाचाही विचार - शिक्षणमंत्री विनोद तावडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा अत्याचार प्रकरण : शाळेची मान्यता काढण्याव्यतिरिक्त संचालक मंडळ हटवून इतर पर्यायी व्यवस्थापनाचाही विचार - शिक्षणमंत्री विनोद तावडे

Share This
खबरकट्टा / मुंबई :(राजुरा लैंगिक अत्याचार प्रकरण )
सात आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचाराची गंभीर नोंद घेतल्याबद्दल राज्य शालेय शिक्षण विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आश्रम निवासी शाळेची मान्यता  रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
11 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या एक दिवसानंतर हे गुन्हे दाखल झाले होते.वसतीगृहाचे अधीक्षक छबन पचारे, उप-अधीक्षक नरेंद्र विरुटकर  सहित दोन महिलां देखभालकर्ते व चोकीदार  यांना अटक करण्यात आली असून सध्या त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे करण्यात आली असून,  आयपीसी कलम 376 (ए) (बी), पोस्को अधिनियम कलम 4 आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रासंगिक विभाग (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत एक गुन्हा  नोंदवला गेला.वसतिगृहातील इतरही मुलींना पीडित  आहे काय  हे पाहण्यासाठी आदिवासी विकास विभागानेही चौकशी सुरु केली असून .
आदिवासी  विभागाने दुसर्या शाळेत 130 मुलींसह 292 विद्यार्थ्यांच्या समायोजनाची  तयारी केली आहे .आदिवासी विकास विभागाच्या अधिका-याने सांगितले की, आम्ही शाळेला काळ्या यादीत टाकून  शाळा शिक्षण विभागाने कठोर कारवाई करावी , अशी शिफारस केली आहे. 
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, " शाळेची मान्यता काढण्याव्यतिरिक्त संचालक मंडळाला  हटवून इतर पर्यायी व्यवस्थापनाचाही विचार करण्यात येत आहे  कारण राजूरा विद्यालयातील अशा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्येही सामावून घेणे सोपे नाही."