ब्रेकिंग न्यूज :गोंडपिपरीत अवैध्य साठवणूक केलेले लाखोंचे चोरबिटी बियाणे जप्त : लवकरच चोरबीटी तस्कररीत शहरातील मोठे मासे अडकण्याची शक्यता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज :गोंडपिपरीत अवैध्य साठवणूक केलेले लाखोंचे चोरबिटी बियाणे जप्त : लवकरच चोरबीटी तस्कररीत शहरातील मोठे मासे अडकण्याची शक्यता

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी विशेष प्रतिनिधी -

शेतीच्या मशागतीची कामे असतांना अवघ्या काही दिवसांवरच शेतीचा हंगाम चालू होनार असतांना जिकडे तिकडे बी - बियाणांचा जिकडे तिकडे साठा करत असतांना अश्यातच 473 पॉकेट प्रतिबिंध आर.आर.बी.टी. चोरबिटी बियाणे  प्रत्येकी 450 किलोग्रेमचे एकून 378400 रुपये किंमतीचा माल अवैध्यरीत्या साठवणूक केला असता नन्दवर्धन येथे प्रतिबंधित कापूस बियाणे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस स्टे. गोंडपिपरी चे ठाणेदार बोरकुटे आपल्या सहकाऱ्यांसह सोबतच क्रुषी अधिकारी मंगेश पवार यांच्यासह नन्दवर्धन येथील संजय धूसे यांच्या घरी झडती घेतली.


या झडतीत  300 पॉकेट चोरबिटि बियाणे अंदाजित किंमत 240000 रुपये तसेच आरोपी शंकर सांगडे यांच्या घराची झडती घेतली असता 173 पॉकेट चोरबिटि बियाणे अंदाजित किंमत 138400 रुपये असा एकून 378400 रुपयांचा माल अवैध्यरीत्या आढळून आला. हयात संजय भाऊजी धूळसे ' शंकर दाऊजी सांगडे ' इन्द्रपाल धूळसे तिन्ही आरोपी राहणार नन्दवर्धन तालुका गोंडपिपरी येथील रहिवासी आहेत. 

तिन्ही आरोपीवर  कलम 420 भादंवि सह कलम बियाणे नियंत्रण आदेश 1983कलम 3(1) 18 ,2,13 बियाणे अधिनियम 1968,7,8,9,10,11,12,13,38 तसेच पर्यावरण संवर्धन 1986 कलम 7,8,15,16नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे . 

काही दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे पडकण्यात आलेल्या चोर बीटी प्रकरणातही गोंडपिपरी तालुल्यातील नंदवर्धन हे गाव चर्चेत होते त्यात तस्करी करणाऱ्या गाडीचा चालक याच गावातील असून त्याला आल्लापल्ली येथे हलविण्यात आल्याचे वृत्त ही अनेक वृत्तपत्रांतून छापून आले होते.त्यानंतर याच गावातून इतक्या मोठया प्रमाणात चोर बीटी बियाणे जप्त करण्यात आल्याने मुख्य तस्करापर्यंत पोलीस लवकरच पोहोचतील अपेक्षित असून असून पोलीस स्टे. गोंडपिपरी अधिक तपास करीत आहेत.

सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खैरे साहेब ' उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकुटे करीत आहेत.