दक्षता :बाहेर पडताना घरातील विद्युत उपकरणे करा काळजीपूर्वक बंद : शॉर्ट सर्किट मुळे बंद घराला आग - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दक्षता :बाहेर पडताना घरातील विद्युत उपकरणे करा काळजीपूर्वक बंद : शॉर्ट सर्किट मुळे बंद घराला आग

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा शहर प्रतिनिधी :

आज सकाळी 11 वाजता  राजुरा येथिल साई नगर निवासी रामदास पडवेकर ह्यांच्या घरातून अचानक धूर  निघू लागल्याने  तपासणी केली असता अचानक आगीचे लोळ दिसताच परिसरातील लोकांची  चांगलीच तारांबळ उडाली.

सविस्तर वृत्त असे की, येथिल साई नगर निवासी रामदास पडवेकर ह्यांच्या घरी किरायाने राहात असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर चौखे हे कुटुंबीयांसह बाहेर गावी गेले असुन आज सकाळी 11 च्या सुमारास घरमालकांना ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. थोड्या वेळातच धुराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलाविले आणि ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरात आग लागली असल्याचा संशय व्यक्त केला. 

दरम्यान नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाला कळविण्यात आले.माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचला त्याचबरोबर विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी देखिल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने अत्यंत जबाबदारीने आग आटोक्यात आणली असुन सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या आगीत ज्ञानेश्वर चौखे ह्यांचे बरेच नुकसान झाले असुन फ्रिज सुद्धा जळाला असल्याचे दिसले त्याचबरोबर त्यांच्या मधल्या खोलीत असलेला सिलिंग फॅनचे पाते सुद्धा उष्णतेमुळे वाकडे झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून घरातील दोनपैकी एकाही सिलेंडर चा स्फोट झाला नाही. 

आगीमुळे एकंदरीत किती नुकसान झाले ह्याचा अंदाज ज्ञानेश्वर चौखे परत आल्यावरच मिळु शकेल.