जिल्हाधीकाऱ्यांना गाढवांची गणना करून जतन करण्याचे राज्य पशुसंवर्धन आयुक्तालयाचे आदेश : विविध आजारांवर गाढवाचे रक्त उपयोगी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हाधीकाऱ्यांना गाढवांची गणना करून जतन करण्याचे राज्य पशुसंवर्धन आयुक्तालयाचे आदेश : विविध आजारांवर गाढवाचे रक्त उपयोगी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

राज्यात गाढवाची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आले जिल्हा निहाय गाढवाची संख्या किती आहे राज्याच्या पशु संवर्धन आयुक्तलयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्यांना दिला हा आदेश जिल्हात धडकल्याने पशुसंवर्धन पथकाच्या विभागाने गाढवाची माहिती संकलित करायची आहे. 


गाढव हा प्राणी कष्टाळू म्हणून जगभरात ओळखला जातो. मात्र या प्राण्याला जगभरात मानवा कडून मान मिळत नाही. प्राणी जगतामध्ये याच प्राण्याच्या वाट्याला उपेक्षा आली आहे. पशु संवर्धन विभागाच्या माहिती नुसार राज्यात 29 हजार 132 गाढव आहेत. हा प्राणी पाळीव असला तरी त्यांच्या कडून कामे करून सोडल्या जाते. 

प्रामुख्याने भटक्या जमाती मध्ये हा प्राणी पाळला जातो. कष्ट करण्यात हा प्राणी थकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या प्राण्याच्या संवर्धनासाठी कागदोपत्री योजना आहेत परंतु प्रत्यक्षात अंमल बजावणी होत नाही असा भटक्या जमाती चा आरोप आहे. 

गाढव या प्राण्याबाबत देशभरातील स्थिती जाणून घेण्यासाठी १० सप्टेंबर २०१७ ला दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाढवांची संख्या कमी होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारला यासंदर्भात दिली. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी.डी. फरकाडे यांनी कार्यवाही सुरू केली. यानुसार राज्यातील घेणार असल्याचे त्यामुळे जिल्ह्यात गाढवांची संख्या किती हे जाहीर होणार आहे. गाढव उपयुक्त प्राणी गाढवांचे अवयव आणि रक्ताचा वापर पशु खाद्यामध्ये केला जातो. 

शिवाय विविध आजारांवरील उपचाराकरिता गाढवांच्या रक्ताचा वापर होतो. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये गाढवांच्या कत्तली होतात. हा प्राणी पाळीव असून मानवाला संरक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यानी प्रतिनिधीना दिली.