स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्राला श्री रोडे परिवाराची विकलांग सेवा संस्थेला भरीव मदत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्राला श्री रोडे परिवाराची विकलांग सेवा संस्थेला भरीव मदत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर -विदर्भ पुत्र असलेले श्री संजय रोडे सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून  आपल्या विदर्भातील विधायक उपक्रमाला मार्गदर्शन व  कृतिशील  सहकार्य सातत्याने करीत असतात. 


काल दिनांक 1 मे  महाराष्ट्र व कामगार दिवसाचे औचित्य साधून श्री संजय व डॉक्टर सौ रोडे परिवारातर्फे विकलांग सेवा संस्थेच्या  शिवणकला प्रशिक्षण स्वयंमरोजगार उपक्रमासाठी त्यांनी 2 शिवनयंत्राची  सस्नेह  भेट  विकलांग सेवा  संस्थेला बांधिलकी स्वरूपात दिली.

स्थानिक तुळशीनगर परिसरात संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमात शिवनयंत्राची पूजा जेष्ठ नागरिक संघाचे श्री मुकुटसिंह सेंगर यांचे शुभ हस्ते  करण्यात आली व मिठाईचे वितरण करण्यात आले.

सदर   कार्यक्रमाला सरिता येरगुडे, अंकिता देशट्टीवार, विद्या चिताडे, पूजा राखोंडे, देवराव कोंडेकर, अशोक खाडे,  प्रसाद पान्हेरकर   पोलीस अधिकारी श्री सचिन राखोंडे,सुभाष तेटवार, खुशाल ठलाल, आम्रपाली पाटील ह्यांची उपस्थिती लाभली होती विधायक मदतीबद्दल ह्याप्रसंगी श्री रोडे परिवारा प्रति  ऋण निर्देश व्यक्त करण्यात आले.