गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल राजुरा येथे शिक्षिकेची पिळवणूक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल राजुरा येथे शिक्षिकेची पिळवणूक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : (शहर प्रतिनिधी -राजुरा):
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, आसिफाबाद रोड राजुरा येथे कार्यरत प्रीती अभय चन्ने नामक शिक्षिकेने  पोलीस ठाणे राजुरा येथे आज लेखी तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार त्या 1फेब्रुवारी 2018पासून सदर शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. 


परंतु त्यांना मागील 7महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने त्यांची आर्थिक व पगार मागण्यासाठी गेले असता शाळाचालकांकडून शिवीगाळ करून पिळवणूक केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा पगार सतत थकबाकी राहत असल्याने, पगाराची रक्कम देन्यासाठी त्यांना संस्थेने 10000रुपये किमतीचा 29/01/2019 या तारखेचा बुलढाणा अर्बन बँक शाखा राजुरा येथील धनादेश दिला होता. चन्ने यांनी तो धनादेश वटविण्यासाठी दिला असता सदर धनादेश बँकेतर्फे बाउन्स करण्यात आला. 

त्यानंतर शैक्षणिक वर्ष संपते पर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला पगाराची संपूर्ण रक्कम देऊ अशा आशयाचा करारनामा संस्थेने स्टॅम्प पेपर वर लिहून दिला परंतु आजपर्यँत 7महिने होऊनही पगाराची रक्कम न मिळाल्याने व रक्कम मागण्यास गेले असता वारंवार शिवीगाळ एकूण त्रस्त झाल्याने प्रीती चन्ने यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.