चित्रपटगृहात दोन हाय प्रोफाइल गटात हाणामारी :दंगा नियंत्रण पथकास पाचारन : एकमेकांस मारणारे जावई अटकेत तर मंत्र्याचा भाचा रुग्णालयात भरती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चित्रपटगृहात दोन हाय प्रोफाइल गटात हाणामारी :दंगा नियंत्रण पथकास पाचारन : एकमेकांस मारणारे जावई अटकेत तर मंत्र्याचा भाचा रुग्णालयात भरती

Share This
चंद्रपूर – 16 मे ला शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात रात्रीच्या शो ला बैठक व्यवस्थेवरून मोठा वाद निर्माण झाला वाद हा इतका वाढला की अखेर दंगा पथकाला परिस्थिती हाताळावी लागली. 


हा वाद  रात्री 9 वाजताच्या शो ला जयस्वाल परिवारातील 4 सदस्य चित्रपट गृहात गेले असता त्यामधील 2 खुर्च्या ह्या नादुरुस्त असल्या कारणाने त्यांना बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितले त्यानंतर चित्रपट सुरू होऊन 1 तास झाला असताना बोनगीरवार परिवारातील 6 सदस्य पोहचले असता त्यांनी आपल्या जागेवर दुसरं कुणी बसून असल्याचे दिसले असता त्यांनी त्या खुर्चीवरून दुसरीकडे बसा असे सांगितले तर जयस्वाल परिवारातील पायल यांनी प्रबंधकाना विचारून आम्ही याजागी बसलेले आहो आपण त्यांना सांगा व दुसरीकडे जाऊन बसण्यास सांगितले.

अमेय बोनगीरवार यांनी अनिल जयस्वाल यांच्या समोर येऊन उभे राहणे त्यावेळेस अमेय यांनी तुम्ही पाय कशाला मारता म्हणून वाद निर्माण केला व हा वाद मारहाणीपर्यंत पोहचला, मी स्थानिक मंत्र्यांचा भाचा आहो असे अमेय यांनी सांगितले व मोबाईल ने कुणाला तरी संपर्क साधला, नंतर 100 ते 150 लोक चित्रपट गृह परिसरात पोहचले.जयस्वाल परिवार खाली येताच तिथे उपस्थित असलेल्या नगरसेवकाने या परिवाराला मारा असे उदगार काढले व उपस्थित जमावाने जयस्वाल परिवाराला मारहाण करायला सुरुवात केली.

महत्वाचे  म्हणजे ही मारहाण पोलिसांसमोर झाली तरी पोलिसांना ही गर्दी नियंत्रणात आणण्यास अपयश आले, पोलिसांनी तात्काळ दंगा पथकाला पाचारण केले व जयस्वाल परिवाराला रामनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले.

पोलीस स्टेशनमध्ये जयस्वाल परिवारावर भादंवि कलम 394, 354,324,323,506,427 मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला, अनिल जयस्वाल व स्वप्नील मोदी यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले, सोबत पायल व त्यांची आई स्वर्णलता जयस्वाल यांना पहाटेपर्यंत रामनगर पोलीस स्टेशनला बसवून ठेवले.

ज्यांनी मारहाण केली त्यांना पोलिसांना सोडून मार खाणाऱ्यावर गुन्हा दाखल केला सर्व आरोपी हे राजकीय कार्यकर्ते  होते असा आरोप पायल जयस्वाल व दीपक जयस्वाल यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला आहे. आम्ही काही मोठे आरोपी नाही, पोलीस आमची साधी तक्रार सुद्धा घेत नाही आहे, आमचं मेडिकल करायला सुद्धा मागे पुढे बघत आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा अशी मागणी पत्रकार परिषदेतून त्यांनी केली आहे. 

स्वप्नील मोदी हे पायल जयस्वाल यांचे पती त्यांना परत सासुरवाडीला नेण्यास आले होते, स्वप्नील हे मुंबई येथे ग्लास फॅक्टरीचे संचालक आहे, तर चोरीचा गुन्हा पोलिसांद्वारे दाखल करण म्हणजे याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला आहे, कायद्याने कोणत्याही महिलेला पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच्या सुमारास बसवून ठेवता येत नाही, ती आरोपी का असेना पण रामनगर पोलिसांनी हा कायदा तुडवून काम केले आहे.

याप्रकरणात न्यायालयाने स्वप्नील मोदी व सासरे अनिल जयस्वाल यांना 2 दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.तर अमेय बोनगिरवार यांना दुखापतीमुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.