कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी युवा पत्रकार दिपक खेकारे यांची निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी युवा पत्रकार दिपक खेकारे यांची निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ तालुका कोरपना च्या अध्यक्ष पदी युवा पत्रकार दिपक खेकारे यांची निवड करण्यात आली हिंदी पत्रकार दिवस व देशाचे पंतप्रधान यांच्या शपथविधीचे औचित्य साधून ग्रामीण पत्रकार संघ कोरपना अध्यक्ष निवडीबाबत बैठक बोलविण्यात आली होती आणि त्या बैठकीत संघातील सर्व पत्रकार बंधूंच्या एकमताने दै.सकाळचे प्रतिनिधी दिपक खेकारे ह्या युवा पत्रकाराची निवड करण्यात आली.

या वेळी संघाचे माजी  अध्यक्ष मुमताज अली,श्रीकांत मोहारे,हबीब शेख ,प्रकाश इसनकर,गणेश लोंढे,कय्युम खान,मयूर एकरे, मनोज गोरे या सर्व पत्रकार बंधूंची उपस्थित होती.

यावेळी सर्व सदस्यांनी नवनियुक्त अध्यक्ष दिपक खेकारे यांना शुभेच्छा देत पेढे भरविले संघातील गौतम धोटे व काही सदस्यांनी फोन द्वारे शुभेच्छा देत सहमती दर्शविली

संपूर्ण संघाच्या सदस्यांनी माझी ग्रामीण पत्रकार संघ तालुका कोरपना च्या  अध्यक्षपदि निवड केल्याबाबत मी सर्वांचा आभारी आहे आणि त्यांनी टाकलेली जबाबदारी मी सर्वपरीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहील-दिपक खेकारे,नवनियुक्त युवा अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ कोरपना तालुका

टीम खबरकट्टा तर्फे ग्रामीण पत्रकार संघ कोरपना तालुक्याचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक खेकारे यांचे हार्दिक अभिनंदन 🌷🍭🌷