नातवाच्या रेशीमगाठीत आजी-आजोबांची दखल : नवयुवकाने काढली हुंडा पद्धत मोडकडीस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नातवाच्या रेशीमगाठीत आजी-आजोबांची दखल : नवयुवकाने काढली हुंडा पद्धत मोडकडीस

Share This
खबरकट्टा / विशेष लेख :(युवा लेखक :आदित्य आवारी-राजुरा )

आयुष्यातील सुखाचा प्रसंग म्हणजे लग्नकार्य! समाजातील अनेक लोक लग्नात आपल्या आत्मिक व सामाजिक विचारांना पुढे करतात, त्याच विचारानुसार लग्न पत्रिकेत वेगवेगळे संदेश समाजा पुढे मांडतांना दिसतात.

त्यातील एक म्हणजे मुळचा मानोली(बु) चा रहिवासी असलेला व आता राजुऱ्यात वास्तव करणारा खुशाल गणपतराव अडवे यांनी लग्न लग्नपत्रिकेतून संतांचे अभंग समाजात पोहचविण्याचे कार्य केलेंच परंतु त्याच बरोबर यांच्या लग्नपत्रिकेत आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे खुशाल ने आपल्या आजी-आजोबांचा फोटो पत्रिकेत टाकलाय व फोटोच्या खाली "आजी-आजोबांच्या आशीर्वादाने" असं वाक्य देखील लिहिलेल आहे. 


समाजात लग्नाच्या वेळी घेतली जाणारी परंपरा म्हणजे 'हुंडा'! खुशालने ही परंपरा मोडकळीस लावून मुलीच्या वडिलांकडून हुंडा देखील घेतलेला नाहीये. आजची तरुण पिढी आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात,त्यांच्या सोबत नकोसे वर्ताव करतात आणि या परिस्थितीत खुशाल सारखा युवक त्याच्या लग्न पत्रिकेच्या स्वरुपातून नवा विचार,नवा संदेश व आपुलकीची भावना समाजासमोर घेऊन येत आहे,खुशालला जेवढी आई-वडिलांची जाण आहे तेवढीच त्याला आजी-आजोबांची देखील आहे.हे यातून स्पष्टपणे दिसून येते.

खुशाल आजी-आजोबांना दैवत समजतो ही सार्‍या समाजासाठी अभिमानाची बाब आहे, खुशाल या कार्यातून समाजाचा आदर्श युवक ठरला आहे. खुशालचा साखरपुडा देखील गेल्या १९ फेब्रुवारीला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साक्षगंध सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

खुशाल सारखा युवक जर आज समाजात घडत राहिला तर पुन्हा संतांचे विचार,सामाजिक चळवळीत योगदान या अशा अनेक बाबी समाजात प्रसारित होत राहील व खुशाल सारखा संस्कारक्षम व वैचारिक युवक घडत राहील.