चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या : वाचा कोणाची कुठे बदली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या : वाचा कोणाची कुठे बदली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा तिढा अखेर सुटला.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील १३ पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांसोबतच ३०० हुन जास्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्गी लावल्या आहेत.
 
  
विविध पोलीस ठाण्यात कार्यरत १३ पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्या त्या पुढीलप्रमाणे :
 • शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस. भगत यांची चंद्रपूर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.
 • सावलीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांची चिमूर पोलीस स्टेशन 
 • चंद्रपूर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक खाडे यांची सावली पोलीस स्टेशन
 • चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक बहादुरे यांची शहर पोलीस स्टेशन येथे 
 • राजुऱ्याचे पोलीस निरीक्षक बी.एम.गायगोले यांची नागभीड
 • वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक के.बी शेळके यांची आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर 
 • मूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.बी.शिंदे यांची जिवती पोलीस स्टेशन
 • जिवतीचे सहायक पोलीस निरीक्षक आर.बी नायकवाड यांची रामनगर पोलीस स्टेशन
 • भारी उप-पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल बोन्द्रे यांची मूल पोलीस स्टेशन
 • नागभीड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राठोड यांची आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर
 • शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए.एम.मालेकर यांची पिट्टीगुडा पोलीस स्टेशन
 • चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक के.एल.मेश्राम यांची भारी पोलीस स्टेशन 
 • तर पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांची चिमूर हुन राजुरा पोलीस स्टेशन 


येथे बदली करण्यात आली आहे.यासह ३०० कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात ही बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. यात चालक, शिपाई यांचाही समावेश आहे.