बाळू -एक संकल्प :विलास बोनगिरवार यांच्या कुटुंबियांची तिरुपति कल्याण महोत्सवा निमित्य ११ कुपोषितांना पोषण आहाराची भेट - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाळू -एक संकल्प :विलास बोनगिरवार यांच्या कुटुंबियांची तिरुपति कल्याण महोत्सवा निमित्य ११ कुपोषितांना पोषण आहाराची भेट

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा :

काही व्यक्तींना समाजाबद्दल खूप आपुलकी असते. समाजातील दुःख त्यांना लवकर टिपता येते. त्यामुळे आपल्या हातून नेहमी समाजासाठी काहीतरी चांगले घडावे या दृष्टीकोनातुन आपल्या जीवनातील आनंदाचे दिवस ते समाजासोबत साजरे करत असतात. अशाच व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे राजुरा तालुक्यातील  'बोनगिरवार' परिवार. त्यांनी ११ कुपोषितांना नुकतीच पोषण आहाराची अनोखी भेट दिली. निमित्य होते तिरुपति कल्याण महोत्सव सोहळ्याचे.
  
माजी नगराध्यक्ष  विलास बोनगिरवार हे राजुरा तालुक्यातील सामाजिक आणि प्रतिष्ठित व्यापारी जगतातील मोठं नाव तिरुपति कल्याण महोत्सव निमित्य अनेक सामाजिक उपक्रमाचा पायंडा गेल्या अनेक वर्षांपासून बोनगिरवार परिवाराने घातला.अश्यातच या वर्षी  राजुरा येथील विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतुन उदयास आलेल्या 'बाळु' संस्तेच्या माध्यमातून स्थानिक ११ कुपोषित बालकांना आहाराची भेट दिली.यावेळी कुपोषण निर्मूलनासाठी आवश्यक आहाराचे वाटप परिवारातील सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालकांना करण्यात आले.

कुपोषितांना पोषण आहाराचे साहित्य भेट देत बालगोपालांना दिर्घायुषी होण्यासाठी नवसंजीवनी दिली आहे.
      
याप्रसंगी अर्चना बोनगीरवार,विलास बोनगिरवार, आसावरी बोनगिरवार, मयुर बोनगीरवार,सुधाकर बोनगीरवार,राकेश बोनगिरवार ,प्रकाश बोनगीरवार ,विजय बोनगीरवार राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे,माजीआमदार सुदर्शन निमकर,सहित 'बाळू' या संकल्पनेचे पुरस्कर्ते  अमित महाजनवार,अमोल ताठे, अनिल पुरटकर,शुभम माडुरवार,विनोद पिप्परवार आदींची उपस्थिती होती.

          
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन  "बाळू"संस्थेचे सदस्य,सामाजिक कार्यकर्ते सुरज माडूरवार यांनी केले.यावेळी शेकडो राजुराकरांची देखील उपस्थिती होती.