खबरकट्टा / चंद्रपूर :
दिनांक २० मे रोजी चंद्रपूरला चौकशी करीता बोलावून कोणतीही विचारपूस न करता तसेच कायदेशीर नोटीस न देता हेतूपुरस्सर ऑक्टोबर २०१८ मध्ये नर्सिंग कॉलेजशी संबंधित घडलेली जुनी तक्रार तसेच नव्या तक्रारी वरून मुख्य आरोपीला सोडून या प्रकरणाशी काहिही संबंध नसताना संस्था अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने धोटे बंधूना २४ तारखेपर्यंत पीसीआर दिला होता. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जमानत मंजूर केली.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे आणि नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचण्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्तांनी केला होता. जमानत मंजूर होताच काँग्रेसच्या कार्यकर्तामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. धोटे बंधूनी हात उंचावून सर्व कार्यकर्त्यांचे अभिवादन केले. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्तांनी पोलीस स्टेशन गाठून खोटी तक्रार दाखल करणाऱ्याच्या विरोधात कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आज काँग्रेस पक्षातर्फे राजुरा येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आजच्या या बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.