नैतिक अध:पतनाचा गुन्हा दाखल झाल्याने नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी राजीनामा द्यावा - शेतकरी संघटनेची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नैतिक अध:पतनाचा गुन्हा दाखल झाल्याने नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी राजीनामा द्यावा - शेतकरी संघटनेची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
           
राजुरा या शहराचे प्रथम नागरीक- नगराध्यक्ष अरुण धोटे यांचेवर एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी  नैतिक अध:पतनाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी राजुरा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा , अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी सचिव प्रभाकर दिवे, जि. प. माजी समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, महिला आघाडी प्रमुख जोत्स्ना मोहीतकर, माजी जि. प. सदस्य पोर्णिमा निरंजने,युवा आघाडी जिल्हाप्रमुख अँड. श्रीनिवास मुसळे यांचेसह  चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.