माजी आमदार सुभाष धोटे व राजुरा नगराध्यक अरुण धोटे यांना तिन दिवसांची पोलीस कोठडी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माजी आमदार सुभाष धोटे व राजुरा नगराध्यक अरुण धोटे यांना तिन दिवसांची पोलीस कोठडी.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
           
कल्याण नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीच्या विनयभंग  प्रकरणातील आरोपी माजी आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे यांना राजुरा कोर्टाने तिन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे येथे खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षांना पोलीस कोठडी सुनावण्याची राजुरा नगराच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे.
        
कल्याण नर्सिंग महाविद्यालय येथे एएनएम च्या दुस-या वर्षाला शिकणा-या एका मुलीने अतिशय गंभीर तक्रार प्राचार्य गुरुराज कुळकर्णी, माजी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे  व इतर तिन यांचेविरुध्द पोलीस अधिक्षक यांचेकडे केली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बोबडे यांनी पिडितेला राजुरा पोलीस ठाण्यात आणून तक्रार नोंदवुन घेतलीआणी रात्री दहा वाजता सुभाष धोटे व अरुण धोटे यांना अटक करुन सुरक्षेच्या कारणास्तव बल्लारपुर पोलीस ठाण्यात ठेवले. आज राजुरा येथील न्यायाधीश व्ही.एस.मेंढे यांच्या न्यालयात हजर केले असता मा. न्यायाधीश यांनी धोटे बंधूंना दिनांक २४ मे पर्यंत तिन दिवसांची पोलीस कोठडी दिली. आरोपीतर्फे  अँड. प्रशांत खजांची व पोलीसांतर्फे सरकारी वकील अँड. श्रीमती क्षिरसागर  यांनी बाजु मांडली.
      
यावेळी न्यायालयात व बाहेर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते  तसेच आदिवासी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. उपविभागिय पोलीस अधिकारी शेखर देशमुख व ठाणेदार बाळू गायगोले यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

------------------------------------------------------------

सुभाष धोटे व अरुण धोटे यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात तात्काळ अटक : स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या साहाय्याने राजुरा पोलिसांची लक्षणीय कामगिरी 
खबरकट्टा / चंद्रपूर :
21 मे 2019 : 7:30AM
           

काल दिनांक 20मे 2019 रोजी राजुरा पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस ठाणे राजुरा यांनी लक्षणीय कामगिरी करीत  सहा आरोपीपैकी कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग  चे संस्थाचालक सुभाष धोटे व अरुण धोटे यांना तात्काळ अटक केली असून सुरक्षेच्या कारणांवरून बल्लारपूर पोलीस ठाणे येथे रात्री उशिरा पोलीस कस्टडीत ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. 

------------------------------------------------------------

धोटे बंधूं सहित 6जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल : सहा महिन्यापूर्वी अर्धवट तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यापासून ठेवण्यात आले होते वंचित 


खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 

20 मे 2019 : 10:30PM 

आज दिनांक 20 मे 2019 ला कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग च्या ANM या कोर्स ला द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचेकडे नर्सिंग कॉलेज मध्ये तिला वारंवार शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्य व इतर लोकांविरुद्ध तक्रार दिली असता पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी  तात्काळ दखल घेत 6आरोपीविरुद्ध  भादंवि 354,354(अ ),354(ड )
504,506,34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                

सविस्तर वृत्त असे की सदर विद्यार्थिनी ही कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे दोन वर्षांपासून शिकत असताना तिला तेथील प्राचार्य गुरूराज कुलकर्णी हे वारंवार नाहक, अश्लील बोलभाषेत तिचा छळ करीत होते . याची तक्रार संस्थाचालक सुभाष धोटे यांना तिने वारंवार दिली होती तरीही त्यांनी कायम दुर्लक्ष केले.त्यानंतर 29 ऑक्टोबर 2018ला रात्री वसतिगृहात प्रांगणात तिच्यासोबत प्राचार्य व इतर 2आरोपींनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर तिने भावाला बोलावून 30ऑक्टोबर 2018ला राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता संथचालक अरुण धोटे यांनी तक्रार नोंदनी करीत असताना जबरदस्तीने उठवून सुभाष धोटे यांच्या घरी नेले असता तिथे पिडीताला व भावाला जीवे मारण्याची व शैक्षणिक रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत सांगितले. 

पुढे तात्काळ दुसऱ्या दिवशी तिला वसतिगृहाततुन काढून देण्यात आले व त्यानंतर तिला वारंवार या ना त्या कारणाने त्रास देणे सुरुच होते. शैक्षणिक वर्ष खराब होऊ नये म्हणून तिने राजुरा शहरात किरायाची खोली घेऊन राहने सुरु केले. 

परंतु राजुरा वसतिगृह अत्याचार प्रकरण घडल्यानंतर तिचा पाठलाग, खोलीवर पाळत असल्याचे ध्यानात येताच मी भीतीने खोली सोडली, आता माझे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली व   त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे  पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मदतीने  तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस उपनिरक्षक प्रियांका बोबडे यांनी स्वतः राजुरा पिडीतेसोबत राजुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली असे पीडितेने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.