अंबुजा येथील तीन युवकांचा मंगी येथील नाल्यात बुडून मृत्यू :सुट्टी घालविण्यासाठी पोहायला जाणे जीवावर बेतले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अंबुजा येथील तीन युवकांचा मंगी येथील नाल्यात बुडून मृत्यू :सुट्टी घालविण्यासाठी पोहायला जाणे जीवावर बेतले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गडचांदूर ):

आज  दिनांक २/०५/२०१९ ला सकाळी  9.30 वाजताच्या दरम्यान सार्थक,मंजित,शुभम , अनुनय ही चार मुले नाल्याकडे फिरायला गेले असता अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनी च्या मांगे असलेल्या मंगी नाल्यात सार्थक , मंजित,शुभम हे तिघेजण अंघोळीला गेले  परंतु सोबत असलेला चौथा युवकव अनुनय हा अंघोळीला गेला नाहीत काही वेळानी अंघोळीला गेलेले त्यांचे मित्र बाहेर न आल्यामुळे त्या मध्ये असलेला चौथा युवक अनुनय यांने अंबुज सिमेंट कॉलेनि कडे धाव घेत  घडलेली सदर घटना सांगितली.


सदर मृत्यु पावल्याच्याची घटना अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनी च्या मांगे असलेल्या मंगी नाल्यात घडली , घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला माहिती 11 :00 वाजता माहिती देत घटना स्थळाकडे धाव घेतली.

पोलीस घटनास्थळी पोहोचत पर्यंत गावकऱ्यांनी मुलांची प्रेत बाहेर काढले होते या घटनेतील शुभम गाजेरे या युवक 22 तारखेला सुट्या घालविण्याकरीत अंबुजा कॉलनी उप्परवाही येथे आला होता.

त्या नंतर युवकांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतक मुलांची नावे - 

१) सार्थक शशीकांत अल्हाट वय - १२ वर्षे 
अंबुजा सिमेंट कॉलोनी उप्परवाही

२) मंजित विजय सिंग वय १४ वर्ष
राह. उप्परवाही मेन गेट वॉर्ड क्रमांक. ०३

३) शुभम दिवाकर गाजेरे वय- १४
रा. रामटेक जिल्हा नागपूर