तात्काळ सर्व रेतीघाटातील रेतीचे उत्खनन व वाहतूक बंद करा किंवा कार्यवाहीस तयार रहा : उच्च न्यायलायचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तात्काळ सर्व रेतीघाटातील रेतीचे उत्खनन व वाहतूक बंद करा किंवा कार्यवाहीस तयार रहा : उच्च न्यायलायचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Share This
-शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून लिलाव : चंद्रपूर  जिल्हाधीकाऱ्यांनी दिले बंदीचे आदेश

खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर, भंडारा सहित इतर 20जिल्हाधीकाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 29 एप्रिल 2019 ला  दिनांक 7 डिसेंबर 2018 च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या रेतीघाट लीलांवच्या विरोधात  दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर तात्काळ सुनवाई करत खंडपीठाने "जर या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी  केलेली कार्यवाही योग्य वाटत असेल तर स्वतःचे जाबदारीवर रेतीघाट सुरु ठेऊन पुढील कार्यवाही साठी तयार रहावे " असा आदेश पारित केला आहे. 


त्यामुळे सदर प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील केलेले सर्व रेतीघाटांचे करारनामे व ताबा दिलेल्या रेतीघाटातून रेतीचे उत्खनन जिल्हाधीकारी चंद्रपूर यांनी अपर सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल  व वनविभाग, मंत्रालय, मुबंई यांचेकडून मार्गदर्शन होई पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाट व वाहतूक बंद ठेवण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत.