राजुरा येथे आईसक्रीम विक्रेत्यास दगडाने मारहाण : शहरात वाढत चालली गुंड प्रवृत्ती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथे आईसक्रीम विक्रेत्यास दगडाने मारहाण : शहरात वाढत चालली गुंड प्रवृत्ती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

स्थानिक  रामनगर कॉलनी, येथील रहिवासी राजु दादाजी गडारी, वय वर्षे २६ यांचा आईसक्रीम विक्रीची हातगाडी  असून गडचांदूर रोडवर मामा हेयर सलून जवळ तो आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय आपल्या वडिल आणि मदतनीस मुलगा भारत बुटले यांच्या मदतीने नियमितपणे करीत आहे.

   
दिनांक ८ मे रोजी रात्री नियमित वेळी दुकान बंद करून घरी जात असताना पराग दातारकर हा इसम आला आणि त्याचे फोटो काढायला लागला. तू माझे फोटो का काढतोयस असे गडारिने त्याला विचारले असता दातारकर यानी हुल्लडबाजी केली आणि ठेल्याजवळील दगड उचलून गडारीच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. त्यात त्याचे डोके फूटून रक्तबंबाळ झाले. तीतक्यात नंदकिशोर डोहे, भारत बुटले यांनी येऊन सोडविले. 

तेव्हा मदतीला आलेले लोक पाहून हल्लेखोर पराग दातारकर मारायचा थांबला. अन्यथा गडारी  यांच्या  जीवाला धोका निर्माण झाला होता, शेवटी मी तुला पाहून घेतो अशी धमकी देऊन आणि शिविगाळ करून दातारकर तिथून निघून गेला असे टीम खबरकट्टा सोबत बोलताना एका प्रत्यदर्शीने सांगितले.  

त्यामुळे या गुंडांकडून गडारी  यांच्या  जीवाला धोका आहे. त्याच्या पासून  संरक्षण मिळावे तसेच त्याच्यावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागनीची राजु गडारी यांनी राजुरा पोलीसात तोंडी तक्रार केली असता ,त्वरित गडारी यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या तोंडी तक्रार व प्राथमिक वैद्यकीय अहवालावरून भादवि 324,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून राजुरा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
ही हल्लेखोर व्यक्ती  व त्याचा चंद्रपूर येथे  राजकीय ऑफिस मध्ये काम करणारा एक मित्र व त्या आईसक्रीम हातगाडीजवळच काही महिन्यापूर्वीच थाटलेल्या एका आईसक्रीम पार्लर च्या मालकाने सदर घटनेच्या आदल्या रात्री दुकानबंद करून जात असताना मला रस्त्यात गाठून तुझ्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे काढलेला परवाना आहे काय म्हणून धक्का बुक्की करण्याचा प्रयत्न केला होता व कोणताही वाद नसताना आईस क्रीम पार्लर वाल्या मित्राच्या दुकानाच्या आसपास  तुझी हातगाडी उभी करु नकोस असा धाक दाखवून व राजकीय दबाव आणून माझा व्यायसाय बंद करू इच्छित आहेत- राजू दादाजी गडरी (जखमी व्यक्ती),राजुरा 

"वाढती गुंडेशाही गुन्हेगारी व राजकीय पाठबळ " वाचा लवकरच खबरकट्टा वर .......