जळीतकांड प्रकरणी अवैध सावकारी करणारा जसबीरसिंग भाटियाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जळीतकांड प्रकरणी अवैध सावकारी करणारा जसबीरसिंग भाटियाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

व्याजाने दिलेल्या कर्जाची रक्कम परत घेण्यासाठी म्हणून कल्पना रघुनाथ हरिणखेडे आणि पियूष रघुनाथ हरिणखेडे या मायलेकांवर पेट्रोल ओतून जाळण्यात आले. 
       


या घटनेच्या आठ दिवसानंतर कल्पना हरिणखेडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या जळीतकांड प्रकरणी अवैध सावकारी करणारा जसबीरसिंग भाटिया याच्याविरूद्ध रामनगर पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक सरकारनगरमधील रघुनाथ हरिणखेडे यांनी अवैध सावकार जसबीरसिंग उर्फ सोनू भाटियाकडून कर्ज घेतले होते. 

कर्जाची रक्कम मागण्यासाठी जसबीरसिंग भाटिया रघुनाथ हरिणखेडे यांच्या घरी गेला असता कल्पना आणि पियूष हरिणखेडे या मायलेकांसोबत जसबीरसिंगचे भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात जसबीरसिंगने या मायलेकांवर पेट्रोल ओतून आग लावली. यामध्ये कल्पना हरिणखेडे आणि पियूष हे दोघेही भाजले गेले. तसेच जसबीरसिंगसुद्धा जखमी झाला. कल्पना हरिणखेडे यांच्यावर नागपर येथे उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. 

त्यामुळे जसबीरसिंग उर्फ सोनू भाटियाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सध्या चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. डॉक्टरांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. जसबीरसिंग भाटिया याने चंद्रपूर शहरात अवैध सावकारीचे मोठे जाळे विणलेले आहे. जवळपास ५ कोटीची गुंतवणूक त्याने केली असल्याची चर्चा ऐकायला येत आहे. 

व्याजाने दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्याने जवळपास २० धडधाकड तरुण पोसले आहे. त्यांच्या बळावर जसबीरसिंग भाटियाचा अवैध सावकारीचा धंदा बहरला आहे. यापूर्वीही त्याने काही लोकांना मारहाण केल्याची चर्चा आहे. मात्र,भानगड नको म्हणून तक्रारी झाल्या नाही. त्यामुळे सोनू भाटियाची ताकद वाढलीआणि त्यामुळे त्याची पेट्रोल ओतून जाळण्यापर्यंत मजल गेली. दरम्यानया जळीतकांडामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.