खाजगी रुग्णालय व मेडिकल स्टोअर्स मध्ये वैद्यकीय डिप्लोमा डिग्री धारकांनाच प्राध्यान्य द्या - सुनीता गायकवाड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खाजगी रुग्णालय व मेडिकल स्टोअर्स मध्ये वैद्यकीय डिप्लोमा डिग्री धारकांनाच प्राध्यान्य द्या - सुनीता गायकवाड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यात खाजगी रुग्णालय व मेडिकल स्टोअर्स यांचे फार मोठे पेव  फुटले असून यात जे फार्मसी डिप्लोमा डिग्रीधारक आहे व नर्सेस म्हणून ज्या महिला काम करतात त्यांना नर्सिंग चा डिप्लोमा आवश्यक आहे.


त्यांची नियुक्ती न करता खाजगी रुग्णालयात व मेडिकल स्टोअर्स मध्ये 10,12वि चे शिक्षण घेतलेल्या मुलां-मुलींना नोकरीला ठेवल्या जात असल्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे समजत नसल्याने मुळेरुग्णांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच खाजगी रुग्णालयात ज्या नर्सेस किंवा वॉर्ड बॉय म्हणून मुलांना ठेवण्यात येते त्यांचे शिक्षण अपुरे असल्यामुळे त्यांना अल्पसा पगार देऊन त्यांचीही आर्थिक पिळवणूक होत असल्याचे अनेक उदाहरणातून समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे रुग्णाचे हाल होत असून त्यांच्या त्यांच्या जीवाशी हे खाजगी डॉक्टर खेळत आहेत. 

त्यामुळे खाजगी दवाखाने व मेडिकल स्टोअर्स मध्ये नर्सिंग डिग्री / डिप्लोमा व फार्मसी चे शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराची संधी देण्यात यावी  अन्यथा मनसे चे जिल्हाध्यक्ष दिलीप रामीडवार यांच्या मार्गदर्शनात, महिला जिल्हाअध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी आंदोलन छेडण्याचा  इशारा जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे. 

या प्रसंगी मनोज तांबेकर, मनसे जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष विमल लांडगे, शहर उपाध्यक्ष किशोर मडगुलवार, फिरोज शेख, पुष्पा दुर्योधन, सांगिता राठोड, माधुरी खोब्रागडे, कविता ठाकरे आदी मनसे सैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.