नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात वाहने जाळली : आठवड्यातील तिसरी हिंसक घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात वाहने जाळली : आठवड्यातील तिसरी हिंसक घटना

Share This
खबरकट्टा / गडचिरोली :

सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलिस ठाण्यांतर्गत येमली-मंगुठा मार्गावर असलेली रस्त्याच्या कामावरील वाहने व यंत्रसामग्री जाळली.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत येमली-मंगुठा रस्त्याचे काम सुरु असून, कामावरील वाहने रस्त्यावर ठेवली होती. रात्री नक्षल्यांनी पाण्याचा टँकर, रोड रोलर, दोन सिमेंट काँक्रिट मिक्सर मशिन व सेट्रींगचे साहित्य जाळले. यामुळे संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले.

मागील आठ दिवसांत एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी केलेली ही तिसरी हिंसक घटना आहे. यापूर्वी ५ मे रोजी नक्षल्यांनी गट्टा येथील शिशिर मंडल या इसमाची हत्या केली, तर ८ तारखेला कारका गावालगत रस्त्याच्या कामावरील पाण्याचे टँकर व मिक्सर मशिन जाळली होती. सततच्या जाळपोळीमुळे नागरिक धास्तावले असून, रस्त्यांच्या कामावर विपरित परिणाम झाला आहे.